आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Collegium Meeting Justice Km Joseph Others Name Finalished News And Updates

सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमची आज बैठक, जस्टिस जोसेफ यांच्याशिवाय इतर नावांवर होणार चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाचा कॉलेजियमची बुधवारी बैठक होत आहे. यामध्ये वरिष्ठ न्यायालयासाठी तीन हायकोर्टच्या चीफ जस्टिसच्या नावांची चर्चा होणार आहे. त्यानंतर या नावांची केंद्र सरकारकडे शिफारस केली जाईल. 11 मे रोजी झालेल्या बैठकीत उत्तराखंडचे चीफ जस्टिस के. एम. जोसेफ यांचे नाव पुन्हा पाठवण्यावर सैद्धांतिक एकमत झाले होते. विशेष म्हणजे सरकारने याआधी त्यांच्या नावाचा प्रस्ताव नाकारला होता. 

 

जस्टिस जोसेफ यांच्या नावाचा पुनर्विचार करावा यासाठी प्रस्ताव परत पाठवला होता
- केंद्र सरकारने जस्टिस जोसेफ यांच्या नावाचा पुनर्विचार करावा यासाठी त्यांचे नाव कॉलेजियमला परत पाठवले होते. 
- चीफ जस्टिस दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत जस्टिस जोसेफ यांचे नाव पुन्हा केंद्राकडे पाठवण्यावर सैद्धांतिक एकमत झाले होते. 
- चीफ जस्टिस मिश्रा यांच्या अध्यक्षतेतील कॉलेजियम मध्ये जस्टिस जे चेलामेश्वर, जस्टिस रंजन गोगोई, जस्टिस मदन बी लोकुर आणि जस्टिस जोसेफ कुरियन हे सदस्य आहेत. 

केंद्राला मंजूरी द्यावी लागेल, केव्हा ते निश्चित नाही 
- कॉलेजियम जर एखाद्या जजच्या नावाची पुन्हा शिफारस करत असेल तर केंद्र सरकारला त्या नावाला मंजूरी द्यावी लागते. वास्तविक केंद्राने त्या नावाला केव्हा मंजुरी द्यावी याला वेळेचे बंधन नाही. 

 

कोणत्या नावावर होऊ शकते चर्चा 
- बुधवारी होणाऱ्या बैठकीत राजस्थान, तेलंगणा-आंध्रप्रदेश हायकोर्टाचे चीफ जस्टिस यांच्या नावावर चर्चा होऊ शकते. मागील बैठकीत यांच्या नावावर एकमत झाले नव्हते. 

बातम्या आणखी आहेत...