आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वोच्च न्यायालयाकडून तलवार दांपत्याला नोटीस; आरुषी हत्याकांडप्रकरणी हेमराजच्या पत्नीची याचिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने नोएडातील बहुचर्चित आरुषी-हेमराज दुहेरी हत्याकांड प्रकरणात डॉ. राजेश आणि डॉ. नूपुर या तलवार दांपत्याला नोटीस बजावून त्यांच्याकडून उत्तर मागवले आहे.  


न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हेमराजची पत्नी खुमकाला बंजाडे यांची याचिका सुनावणीसाठी स्वीकारली आणि तलवार दांपत्याला नोटीस जारी करून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे.  उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने २६ नोव्हेंबर २०१३ ला तलवार दांपत्याला दोषी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती, पण अलाहाबाद उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी १२ ऑक्टोबरला तलवार दांपत्याची निर्दोष मुक्तता केली होती. मे २००८ मध्ये तलवार दांपत्याच्या नोएडा येथील निवासस्थानी त्यांची १४ वर्षीय मुलगी आरुषी मृतावस्थेत आढळली होती, तिचा गळा कापण्यात आला होता. सुरुवातीला हत्येचा संशय घरगुती नोकर हेमराज याच्यावर होता, पण दोन दिवसांनंतर हेमराजचा मृतदेह आढळला होता.

बातम्या आणखी आहेत...