आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसाला एक कोटी फीस घेणारे मोठे वकीलदेखिल मूग गिळून गप्प असतात:चेलमेश्वर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जस्टीस चेलमेश्वर म्हणाले, मी अनेक मुद्दे आणि मुल्यांवर उभा राहिलो.-फाइल - Divya Marathi
जस्टीस चेलमेश्वर म्हणाले, मी अनेक मुद्दे आणि मुल्यांवर उभा राहिलो.-फाइल

जस्टीस चेलमेश्वर यांनी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या निरोप समारंभात सहभागी होण्यास नकार दिला होता. 

सुप्रीम कोर्टात दुसऱ्या क्रमांकाचे वरिष्ठ जस्टीस जे चेलमेश्वर 22 मे रोजी निवृत्त होत आहेत. 

 

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टातून निवृत्त होत असलेल्या जस्टीस जे चेलमेश्वर यांनी वरिष्ठ वकिलांबाबत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, दिवसाला 1 कोटी फीस घेणारे वकील कधीही कोणत्याही मुद्द्यावर भूमिका घेत नाहीत. इतर तीन न्यायाधीशांसह काही मुद्द्यांविरोधात आपण उभे राहिलो होतो, असे चेलमेश्वर म्हणाले. आम्ही कोणाच्या विरोधात नव्हतो किंवा यात काही स्वार्थ नव्हता, असेही ते म्हणाले. चेलमेश्वर हे सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांपैकी एक होते. 


तरुण पिढीचा पाठिंबा 
चेलमेश्वर म्हणाले की, न्यायपालिकेत लोकशाही असावी यासाठी तरुण वकिलांनी मला पाठिंबा दर्शवला. तर काही जुन्या आणि सेवानिवृत्त न्यायाधीशआंनी हल्ला चढवला. मी माझ्या कोणत्याही निर्णयाचा बचाव करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली नव्हती. सार्वजनिक रित्या बोलल्यानंतर हे सर्व बोलले जाणार हे मला माहिती होते, असेही ते म्हणाले. 


मुल्यांसाठी उभे राहायला हवे 
चेलमेश्वर यांनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी आलेल्या वकीलांच्या एखा गटाशी चर्चा केली. या दरम्यान ते म्हणाले, मी मुद्दे आणि मुल्यांसाठी उभा राहिलो. काही गोष्टी चुकीच्या दिशेने जात आहेत असे जेव्हा मला वाटले तेव्हा मी काही प्रश्न उपस्थित केले. मला वाटते की, काहीतरी चांगले घडत असेल तर ते मान्य करायला हवे. कशाच्या बाबतीत संशय असेल तर त्याची चौकशी करायला हवी. ते दुरुस्त करायला हवे. 


निरोप समारंभात न जाणे हा खासगी विषय 
जस्टीस चेलमेश्वर यांनी सुप्रीम कोर्ट बास असोसिएशनच्या निरोप समारंभात सहभागी न होणे याबाबत म्हटले की, निवृत्ती ही माझी खासगी बाब आहे. त्याला सार्वजनिक रुप द्यायला नको. 18 मे रोजी त्यांचा निरोप समारंभ होणार होता. पण त्यांनी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन (एससीबीए) चे आमंत्रण नाकारले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...