आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीटसह राष्ट्रीय परीक्षांना आधार सक्तीचे नाही; सर्वाेच्च न्यायालयाचे निर्देश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'नीट\' परीक्षेसाठी 9 मार्चपर्यंत फॉर्म भरले जाणार आहेत. (फाइल) - Divya Marathi
\'नीट\' परीक्षेसाठी 9 मार्चपर्यंत फॉर्म भरले जाणार आहेत. (फाइल)

नवी दिल्ली- ‘नीट’सह राष्ट्रीय पातळीवरील इतर सर्व परीक्षांसाठी तूर्तास आधार क्रमांक सक्तीचा नसेल. एका विद्यार्थ्याच्या याचिकेवर बुधवारी सर्वाेच्च न्यायालयाने हा दिलासा दिला. आधारऐवजी मतदार ओळखपत्र, वाहन परवाना वा इतर ओळखपत्रे वापरली जाऊ शकतात, असेही स्पष्ट केले. याचिकाकर्ता आबिद अली पटेलने सांगितले होते की, नीटच्या अर्जासाठी आधार सक्तीचा केलेला आहे. सुप्रीम कोर्टात आधारची सुनावणी प्रलंबित आहे. यामुळे आधार सक्ती अयोग्य आहे.

 

घटनापीठाचा निर्णय

- सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेतील घटनापीठाचे 5 न्यायाधीश नीट नोटिफिकेशनविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी करत आहे. 

 

कोर्ट काय म्हणाले- बोर्डाने साइटवर माहिती अपलोड करावी 
- वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने सीबीएसईला म्हटले आहे की नीट-2018 साठी फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना आधारी सक्ती करु नये. हा आदेश 9 मार्चपर्यंत लागू राहाणार आहे. 9 मार्चपर्यंत नीटची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. बोर्डाने ही माहिती आपल्या वेबसाइटवर अपलोड करावी असे कोर्टाने म्हटले आहे. 
- दुसरीकडे, आधार देणाऱ्या यूआयडीएआयने कोर्टाला सांगितले की मेडिकल एंट्रान्स टेस्टसाठी सीबीएसईने आधार अनिवार्य करावे असा अधिकार आम्ही त्यांना दिलेला नाही. 
- नीटसाठी फॉर्म भरण्याची अखेरीच तारीख 9 मार्च आहे तर 6 मे रोजी परीक्षा होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...