आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1984च्या शीख दंगलीतील 186 केसेस पुन्हा उघणार, SC ने दिले नवीन SIT स्थापनेचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 1984 मधील शीख विरोधी दंगल प्रकरणी सुप्रीम कोर्टाने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले आहे. न्यायमूर्ती के.पी.एस. राधाशरण आणि न्यायमूर्ती जे.एम. पांचाल यांच्या देखरेखीतील समितीने पहिल्या एसआयटीद्वारा करण्यात आलेल्या तपासावर सुप्रीम कोर्टाला आपला रिपोर्ट दिला आहे. 

 

सुप्रीम कोर्टाने तीन सदस्यीय एसआयटीमध्ये हायकोर्टाचे एक निवृत्त न्यायाधीश, एक निवृत्त आयपीएस अधिकारी आणि एक विद्यमान आयपीएस अधिकारी यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहे. ही एसआयटी बंद करण्यात आलेल्या 186 प्रकरणांची फेर तपाणी करुन अहवाल सादर करेल. त्यानंतर या केसेस पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. 

कोर्टाच्या आदेशानंतर एसआयटीसाठी सरकारने काही नावे सुचवली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने या नावांना मंजूरी दिलेली नाही. कोर्टाने सरकराला गुरुवारपर्यंत नवीन उपयुक्त नावे देण्यासाठी वेळ दिला आहे. त्यानंतर एसआयटीची स्थापना होऊन तपास सुरु होईल. 

याआधी सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीतील समितीची स्थापन करण्यात आली होती. या समितीने पहिल्या एसआयटीने केलेल्या तपासाचे अवलोकन केले होते. पहिल्या एसआयटीने 1984च्या दंगलीनंतर दाखल 294 प्रकरणांपैकी 186 केसेस कोणताही तपास न करता बंद केल्या होत्या. त्यावर समितीने बोट ठेवले होते. 


- गेल्या वर्षी दिल्ली हायकोर्टानेही एक महत्त्वाचा निर्णय दिला होता. 1984 च्या दंगलीसंदर्भातील पाच प्रकरणांच्या फेर तपासणीचे आदेश हायकोर्टाने दिले होते. या सर्व प्रकरणांचा तपास 1986 मध्ये बंद करण्यात आला होता. यामध्ये सज्जन कुमार, बलवान खोखर, महेंद्र यादव, कृष्ण खोखर आरोपी होते. 

 

सीबीआयने दाखल केलेल्या याचिकेमध्ये 1986 ची चार्जशीट 10,11, 31, 32 आणि 33 मध्ये सज्जनकुमार आणि बाकी आरोपींना निर्दोष सोडण्यात आलेल्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. हायकोर्टाने या पाच प्रकरणांमध्ये सुमोटो दाखल करुन घेत म्हटले होते की प्रमुख साक्षीदारांची चौकशीच झाली नव्हती. 

बातम्या आणखी आहेत...