आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जस्‍टीस लोयांचा मृत्यू नैसर्गिकच होता, चौकशीची मागणी करणारी याचिका हा कट: सुप्रीम कोर्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणाची सुनावणी करणारे विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच. लोया मृत्यूप्रकरणी स्वतंत्र एसआयटी चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. न्या. लोया यांचा मृत्यू नैसर्गिकच होता. यामागे कोणताही कट नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ही याचिका म्हणजे न्यायपालिकेला बदनाम करण्याचा कट असल्याचेही न्यायालयाने सुनावले.


सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या न्यायपीठाने नमूद केले की, घटनास्थळी उपस्थित न्यायाधीशांच्या जबाबावर संशय घेतला जाऊ शकत नाही. ‘कॅरेवॉन’मध्ये २०१७ मध्ये प्रकाशित लेखाचा उल्लेख करून सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, या लेखात न्या. लोया यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करण्यात आला होता. याच आधारे महाराष्ट्र पोलिसांकडे न्यायाधीशांच्या जबाबांवर अविश्वास दाखवता येणार नाही.

 

प्रशांत भूषण यांचा चुकीचा युक्तिवाद : या प्रकरणात प्रशांत भूषण यांनी न्या. ए. एम. खानविलकर अाणि डी. वाय. चंद्रचूड यांना न्यायपीठातून काढून टाकण्याची मागणी केली होती. हे दोघेही महाराष्ट्राचे असून मुंबई हायकोर्टातील जजशी ओळख असल्याचा युक्तिवाद भूषण यांनी केला होता. यावर सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतला.

 

इंदिरा जयसिंह, प्रशांत भूषण यांच्यावर ताशेरे
यासंबंधीच्या याचिका अपमानास्पद व गुुन्हेगारी अवमानना आहे. मात्र, कारवाई करणार नाही, असे स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे वकील दुष्यंत दवे, इंदिरा जयसिंह आणि प्रशांत भूषण यांच्यावर ताशेरे ओढले.


तीन पैलूंवरून निष्कर्ष : न्या. चंद्रचूड 

- चार साक्षीदार जज आणि न्या. लोया यांच्या सहकाऱ्यांचे जबाब निर्विवाद आहेत. यावर संशय घेता येणार नाही.
- न्या. लोया मृत्यूपूर्वी गेस्ट हाऊसमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह एकाच खोलीत थांबले होते.
- न्या. लोया यांनी ३० नोव्हेंबरला पत्नीस फोन करून आपण गेस्ट हाऊसमध्ये थांबल्याचे सांगितले हाते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा चार सहकारी जज सोबत हाेते.

 

सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट हॅक : न्या. लोया मृत्यू प्रकरणाचा निर्णय सुनावल्या जाण्याच्या काही मिनिटे अगोदर सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट हॅक झाली होती.

 

आजचा दिवस दु:खद : काँग्रेस 

हा दिवस दु:खद असल्याचे सांगून काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी १० प्रश्न उपस्थित केले. तर, केंद्रीय मंत्री व भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगितले. 

 

काँग्रेसचे १० मुद्दे... मृत्यू नैसर्गिक होता की नाही हे तपासाशिवाय कळणार नाही​

- लोया यांच्या सहकारी न्यायाधीशांचे जबाब न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर घेण्यात आले नाहीत
- मृत्यू जर नैसर्गिक असेल तर तपासाला घाबरण्याचे कारण काय?
- न्या. लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले. पण ईसीजी रिपोर्टमध्ये तसे का दाखवले नाही?
- पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांचे नाव चुकीचे का दिले गेले?
- न्या. लोया यांना १०० कोटी रुपयांची लाच, एक फ्लॅट देण्याचे आमिष दाखवले गेले?
- न्या. लोया नागपूरच्या विश्रामगृहात थांबल्याचे काहीच रेकॉर्ड नाही?
- विश्रामगृहात अनेक खोल्या होत्या. पण तीन न्यायमूर्ती एकाच खोलीत का थांबले?
- नागपूरमध्ये न्या. लोया यांची सुरक्षा व्यवस्था का घटवली?
- न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणात ज्या गोष्टींवर संशय निर्माण होतो ती तथ्ये सर्वोच्च न्यायालयासमोर का ठेवण्यात आली नाहीत?

 

राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न
सत्तारूढ पक्षाच्या अध्यक्षाशी संबंधित प्रकरण असल्याने राजकीय लाभासाठी हे आरोप केले जात आहेत. अमित शहा यांना गुन्हेगारी प्रकरणातून निर्दाेष मुक्त केल्यावर त्यांचा संबंध न्या. लोयांशी जोडला जात आहे.
- मुकूल रोहतगी, महाराष्ट्र सरकारचे वकील

 

महाराष्ट्र सरकारचा चौकशीस विरोध
हे हत्येचे प्रकरण आहे आणि यात काय चार न्यायाधीशांची संशयित म्हणून चौकशी करणार का? या जजनी ज्या लोकांसाठी न्यायदान केले त्यांना काय वाटेल? या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या जजना संरक्षणच दिले पाहिजे.
- हरीश साळवे, महाराष्ट्र सरकारचे वकील

 

नागपूर पोलिसांच्या तपासावर शिक्कामोर्तब

 न्या. लोया यांच्या मृत्यूचा तपास नागपूर पोलिसांनी केला होता. या निकालामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले असल्याची मत नागपूरचे सह पोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी व्यक्त केले. नागपूर पोलिसांनी संपूर्ण तपासानंतरच न्या. लोयांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा निष्कर्ष काढला. तपासावर विनाकारण संशय घेण्यात आला होता, असेही बोडखे म्हणाले.

 

पुढील स्लाईड वर पहा, जज लोया प्रकरणाचा घटनाक्रम....

 

हेही वाचा,

लोया यांच्या मृत्यूची निःपक्ष चौकशी होणे गरजेचे, काँग्रेससह 16 पक्ष राष्ट्रपतींना भेटणार

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...