आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कावेरी जल विवाद : सुप्रीम कोर्टाचा निर्णय, तमिळनाडूचे 15 TMC पानी कमी केले, कर्नाटकला फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कावेरी जल विवाद 19 व्या शतकात सुरू झाले होते.-फाइल - Divya Marathi
कावेरी जल विवाद 19 व्या शतकात सुरू झाले होते.-फाइल

नवी दिल्ली - कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळमध्ये कावेरी नदीच्या पाणी वाटपाबाबत दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या वादावर सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी निर्णय सुनावला. त्यात तमिळनाडूला कर्नाटककडून मिळणाऱ्या 192 टीएमसी (थाऊजंड मिलियन क्युबिक) फूट पाण्यापैकी 14.75 टीएमसी पाण्याची कपात केली. आता हे पाणी कर्नाटकला मिळेल. तीन राज्यांनी फेब्रुवारी 2007 च्या कावेरी ट्रिब्युनलच्या निर्णयाला आव्हान दिले होते. सुप्रीम कोर्टने गेल्यावर्षी 20 सप्टेंबरला सुनावणी करताना आजचा दिवस सुनावणीसाठी ठरवला होता. कर्नाटक आणि तमिळनाडू दोघे एकमेकांना कमी पाणी मिळावे म्हणून झगडत होते. स्वतःच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी हे भांडण होते. 


कुठून कुठून जाते कावेरी नदी 
- कावेरी नदी कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळमध्ये वाहते. समुद्रात जाण्यापूर्वी ती पदुच्चेरीच्या कराइकलमधूनही जाते. 
- 800 किमी लांबीची कावेरी नदी पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वतातून निघते. हा भाग कर्नाटकच्या कुर्ग परिसरात येतो. 


असा आहे वाद... 
- कावेरी नदीत चारही राज्यांच्या नदी आणि तलावांचे पाणी मिळते. त्याचे 740 टीएमसी फूट पाणी वापरले जाते अशी माहिती आहे. 
- कर्नाटक 462 टीएमसी फूट पाणी सोडते, त्यापैकी त्याला 270 टीएमसी फूट टीएमसी पाणी वापराची परवानगी होती. 
- तमिळनाडू 227 टीएमसी फूट पाणी सोडते, त्याला 419 टीएमसी फूट पाण्याचा वापर करण्याची परवानगी होती. 
- केरळ 51 टीएमसी फूट पानी सोडते. त्याला 30 टीएमसी फूट पाणी मिळत होते. 
- 14 टीएमसी फूट पाणी पर्यावरणासाठी सोडावे लागते. 
- त्यानुसार कर्नाटक सर्वाधिक पाणी सोडत असूनही त्याला कमी पाणी मिळत होते. लवादाच्या निर्णयानुसार त्यांना 192 टीएमसी फूट पाणी तमिळनाडूला द्यायचे होते. त्याला त्यांचा विरोध होता. 


आता कुणाला किती पाणी मिळणार?
कर्नाटक : 270+14.75 = 284.75 टीएमसी फूट
तमिळनाडू : 227+192-14.75 = 404.25 टीएमसी फूट 
केरळ : 30 टीएमसी फूट
पुदुच्चेरी : 7 टीएमसी फूट


केव्हा सुरू झाला वाद?  
मद्रास प्रेसिडन्सी आणि म्हैसूर राज्यापासून म्हणजे 19 व्या शतकापासून हा वाद सुरू होता. त्यावेळी इंग्रजांची सत्ता होती. 1924 मध्ये या दोघांत एक करार झाला. पण नंतर केरळ आणि पदुच्चेरीही वादात आले. 1976 मध्ये चारही राज्यांत तडजोड झाली. पण त्याचे पालन करण्यात आले नाही. 

 

 

बातम्या आणखी आहेत...