आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश प्रभु यांच्याकडे नागरी उड्डाण खात्याचा अतिरिक्त प्रभार, टीडीपीच्या गजपतींनी दिला होता राजीनामा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरेश प्रभु यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग खाते आहे. त्यांना नागरी उड्डाणचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला. (फाइल) - Divya Marathi
सुरेश प्रभु यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग खाते आहे. त्यांना नागरी उड्डाणचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला. (फाइल)

नवी दिल्ली - केंद्र सरकारमधील तेलगु देसम पक्षाच्या (टीडीपी)  दोन मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या नागरी उड्डाण मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार सुरेश प्रभु यांच्याकडे देण्यात आला आहे. टीडीपीच्या कोट्यातून अशोक गजपती राजू हे या खात्याचे मंत्री होते. शनिवारी राष्ट्रपती भवनाकडून सांगण्यात आले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी प्रभु यांना नागरी उड्डाण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. प्रभु यांच्याकडे सध्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची जबाबदारी आहे. प्रभु हे रेल्वेमंत्री म्हणुन मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले होते. 


टीडीपीने का सोडली मोदींची साथ? 
- आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा ही तेलगु देसम पक्षाची (टीडीपी) मागणी होती. केंद्र सरकारकडून मागणी मान्य होत नाही असे लक्षात आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आपल्या दोन मंत्र्यांना केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. 
- त्यानुसार नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू  आणि वाय. एस. चौधरी यांनी गुरुवारी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपतींनी त्याला मंजूरी दिली. 

 

रेल्वे मंत्री होते सुरेश प्रभु 
- गेल्यावर्षी वाढलेल्या रेल्वे अपघातानंतर सुरेश प्रभु यांच्या कामकाजावर टीका होत होती. यानंतर प्रभुंनी पंतप्रधानांकडे राजीनामा सोपवला होता. त्यांच्या कार्यकाळात 20 अपघात झाले होते.
- त्यानंतर मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आला व रेल्वे मंत्रालय पीयूष गोयल यांच्याकडे देण्यात आले तर प्रभुंना वाणिज्य मंत्रालय देण्यात आले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...