आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - मोसूलमधून अपहरण करण्यात आलेल्या 39 भारतीय नागरिकांच्या मृत्यूची माहिती संसदेत दिल्यानंतर सुषमा स्वराज यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या की, सकाळी मी जेव्हा व्यंकय्या नायडूंशी याबाबत चर्चा केली, तेव्हा ते म्हणाले की, यादरम्यान सभागृहात शांतता ठेवण्यासाठी मी नेत्यांसी चर्चा करेल. त्यानुसार राज्यसभेत सर्वांनी अत्यंत विनम्रपणे माझे म्हणणे ऐकले. मला वाटले की, लोकसभेमध्येही असेच होईल. मी वेलमध्ये येणाऱ्या आणि आंदोलन करणाऱ्या खासदारांशी बोलले. ते म्हणाले आम्ही वेलमध्येच राहू, पण शांत राहू. लोकसभेत गोंधळ घालणाऱ्यांचे नेतृत्व काँग्रेसने केले. ज्योतिरादित्य यांनी पुडाकार घेतला होता.
एवढीही संवेदनशीलता शिल्लक नाही का?
सुषमा स्वराज म्हणाल्या, काँग्रेसच्या वर्तनाने आज सर्व सीमा ओलांडल्या आहेत. सरकारचे संपूर्ण म्हणणे रेकॉर्डमध्ये आले, असे कसे झाले. जेवढ्या जड अंतःकरणाने लोकसभेत गेले होते, तेवढ्याच जड अंतःकरणाने मी परत आले. आता मृत्यूवरही आपण राजकारण करणार आहोत का? राज्यसभेत त्यांनी पाहिले होते की, मी वाईट बातमी घेऊन आले आहे. पण मला बोलूच दिले गेले नाही. मला काँग्रेसला विचारायचे आहे की, असे काय कारण होते की, त्यांनी संसदेच्या कामकाजात अडथळा आणला.
जेजे शक्य ते सर्व केले..
सुषमा पत्रकार परिषदेत म्हणाल्या की, या घटनेबाबत बोलायचे झाले तर मी हेच सांगेल की, ही घटना जून 2014 मधील आहे. आता मार्च 2018 आला आहे. या दरम्यान या सर्व लोकांना शोधण्यासाठी शक्य ते सर्वकाही करण्यात आले. जे काही करता येईल असे वाटले होते, ते सर्वकाही सरकारने केले. पंतप्रधानांसह आम्ही सर्व याच प्रयत्नात होतो. मी सर्व द्विपक्षीय चर्चांची साक्षीदार आहे. प्रत्येकवेळी पंतप्रधानांनी अत्यंत संवेदनशीलतेने या 39 लोकांना शोधण्याचा मुद्दा उपस्थित केला. कोणालाही पुरावा नसताना मृत घोषित करू नये हे जबाबदार सरकारचे कर्तव्य असते. काही सराकारांकडून बेपत्ता लोकांना मृत समजले जात असते. पण मी अनेकदा हे सांगितले होते की, पुरावे मिळेपर्यंत त्यांना मृत घोषित करणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.