आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजमध्ये सुरु झाली होती सुषमा स्वराज यांची LOVE STORY, आडनावामागे आहे हे रहस्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुषमा स्वराज आणि त्यांचे पती स्वराज कौशल. - Divya Marathi
सुषमा स्वराज आणि त्यांचे पती स्वराज कौशल.

नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा आज 66वा वाढदिवस आहे. त्यासोबतच आज व्हॅलेंटाइन डे आहे. यानिमित्ताने DivyaMarathi.com सांगत आहे सुषमा आणि त्यांचे पती स्वराज कौशल यांची प्रेम कहाणी. 

 

सुषमा आणि स्वराज कौशल यांची प्रेमकथा त्यांच्या कॉलेजच्या दिवसांत सुरु झाली होती. 13 जुलै 1975 मध्ये त्यांनी लग्न केले. लग्नानंतर सुषमा राजकारणात सक्रीय झाल्या होत्या. सुषमा राजकारणात सक्रीय असल्या तरी त्यांचे पती त्यांच्या कामात कोणतीही दखल देत नाही. त्यांनी सुरुवातीलाच एक नियम करुन घेतला होता, 'सहयोग पूर्ण, हस्तक्षेप शून्य'.
सुषमा स्वराज देखील सांगतात की त्यांच्या राजकीय जीवनात पतीचा हस्तक्षेप नसतो. 

 

अशी सुरु झाली होती सुषमा-स्वराज यांची लव्हस्टोरी 
- सुषमा आणि स्वराज कौशल हे पंजाब विद्यापीठाच्या चंदीगड मधील लॉ डिपार्टमेंटमध्ये क्लासमेट होते.
- कॉलेजच्या वक्तृत्व स्पर्धा, डिबेट यामध्ये ते सहभागी होत होते. सुषमा या त्यांच्या टीमकडून हिंदी बोलत होत्या तर स्वराज हे इंग्रजीत आपले भाषण करत होते. 
- त्याकाळात सुषमा स्वराज या 'जेपीं'च्या आंदोलनात होत्या. जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी सरकारविरोधात आवाज बुलंद केलेला होता. त्यांच्या छात्र वाहिनीमध्ये सुषमा स्वराज काम करत होत्या. त्यासोबतच त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) च्या कार्यकर्त्या होत्या. तर स्वराज हे समाजवादी युग जनसभेचे सदस्य होते. 
- दोघांच्या टीमने कधीही स्पर्धेचा पहिला पुरस्कार सोडलेला नव्हता. दोघांचा उद्देश, विचार आणि समज ही एकसारखी होती. 
- येथूनच दोघे एकमेकांकडे अॅट्रॅक्ट होत गेले आणि दोघे प्रेमात पडले. 
- दोघांचे कुटुंब एकमेकांना आधीपासून ओळखत होते, त्यामुळे लग्नात काही अडथळा आला नाही. 
- सुषमांचे वडील हरदेव शर्मा हे आपल्या मुलाचे स्थळ घेऊन स्वराज कौशल यांच्या आईकडे गेले होते. त्यांनी तत्काळ या लग्नाला होकार दिला. 
- दोघांचे वय, प्रोफेशन आणि विचारधारा सर्वकाही जुळत होते त्यामुळे त्यांच्यातील नाते हे लवकरच पक्के होत गेले. 
- सुषमा यांनी त्यांचे अडनाव म्हणून पतीचे नाव 'स्वराज' लावण्यास सुरुवात केली ती आजपर्यंत कायम आहे. 
- सुषमा आणि स्वराज कौशल यांना एक मुलगी आहे. तिचे नाव बांसुरी आहे. श्रीकृष्ण हे आवडते दैवत असल्यामुळे सुषमा यांनी मुलीचे नाव बांसुरी ठेवले. ती देखील वकील आहे. 

बातम्या आणखी आहेत...