आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Take Care Of Your Health: PM To Airman Who Fainted During Guard Of Honour Ceremony

राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमादरम्यान हवाई दलाचा जवान भोवळ येऊन पडला, मोदी म्हणाले- तब्यतेची काळजी घ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सेशल्सचे राष्ट्रपती डॅनी फॉरे प्रथमच भारत दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी राष्ट्रपती भवनात त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. सेशल्सच्या राष्ट्रपतींना मानवंदना देत असताना हवाई दलाचा एक जवान भोवळ येऊन पडला. सहकारी जवानांनी त्याला सावरले. सोमवारी दिल्लीतील तापमान वाढले असल्यामुळे असे झाले असण्याची शक्यात सूत्रांनी वर्तवली आहे. सोहळा संपल्यानंतर पंतप्रधानांनी जवानाजवळ जाऊन त्याला तब्यतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला. काही मिनिटे ते त्याच्यासोबत बोलत होते. 

 

- नरेंद्र मोदी आणि डॅनी फॉरे यांच्यात दुपारी 2 वाजता द्विपक्षिय चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांदरम्यान 6 करार झाले. 
- फॉरे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने संरक्षण क्षेत्रातील आगामी आव्हाने लक्षात घेऊन काम सुरु केले आहे. विशेषतः जलवायु परिवर्तन, इतर राष्ट्रांसोबतचे संबंध सुधारण्याच्या दृष्टीने भारताने प्रयत्न सुरु केले आहेत. भारताकडे दुरदृष्टीकोण दिसून येत आहे. 

भारताने संरक्षण क्षेत्रासाठी सेशल्सला दिले 681 कोटी रुपये 
- मोदी म्हणाले, भारत आणि सेशेल्स यांच्यात महत्त्वाचे करार झाले आहे. आम्हाला हिंद महासागरात शांतता, सुरक्षितता आणि स्थैर्य निर्माण करण्याच्या दृष्टीने एकत्रित काम करायचे आहे. लोकशाही मुल्यांचा आम्ही सन्मान करतो. संरक्षणासाठी आम्ही सेशल्सला 100 मिलियन डॉलर अर्थात 681 कोटी रुपये कर्ज दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...