आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - आंध्रप्रदेशला विशेष राज्याच्या दर्जा देण्याच्या मागणीसाठी एका टीडीपी (तेलुगू देशम पार्टी) खासदाराने अभिनव पद्धत शोधली. टीडीपी खासदार एन. शिवाप्रसाद यांनी एका तेलुगू महिलेची वेशभूषा करून, साडी घालून संसद भवन गाठले. त्यांच्यासोबत खासदार रेणुका चौधरीही होत्या. शिवाप्रसाद यांच्या कपाळावर टिकली लागलेली होती आणि गळ्यात मंगळसूत्रही होते. संसदेच्या सदनांमध्ये होत असलेल्या गोंधळाच्या दरम्यान हे खासदारही यामुळे चर्चेत आले.
असे आहे प्रकरण...
- टीडीपी आपल्या मागणीवरून संसदेत सातत्याने विरोध प्रदर्शित करत आली आहे.
- सूत्रांनुसार, टीडीपी बजेट सादर झाल्यापासूनच मोदी सरकारवर नाराज आहे. त्यांच्या मते, सरकारने त्यांच्या राज्यासोबत भेदभाव केला आहे.
- याअंतर्गत टीडीपीने सरकारचा आपला पाठिंबा काढून घेतला आहे.
- सूत्रांनुसार, टीडीपी आणि राजशेखर रेड्डी यांनी केन्द्राला नोटीस देत म्हटले होते की, ते सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित करतील.
- सदन स्थगित झाल्याच्या कारणामुळे अविश्वास प्रस्ताव पारित होऊ शकला नाही.
याआधीही केली होती कोळ्याची वेशभूषा
- खासदार एन. शिवाप्रसाद हे यापूर्वी कोळ्याच्या वेशभूषेत संसदेत गेलेले आहेत.
- ते म्हणाले होते की, त्यांना PM मोदींना पकडायचे आहे, जे नेहमी विदेशातच फिरत असतात.
- एन. शिवाप्रसाद पुढे म्हणाले होते की, मोदींना सर्वसामान्यांची बिलकूल काळजी नाही.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी Photos...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.