आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीडीपी एनडीएतून बाहेर, केंद्राविरुद्ध ‘अविश्वास’; मोदी सरकारविरुद्ध प्रथमच अविश्वास ठराव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यामध्ये टीडीपीच्या दोन मंत्र्यांनी केंद्र सरकारला राजीनामा दिला होता. - Divya Marathi
गेल्या आठवड्यामध्ये टीडीपीच्या दोन मंत्र्यांनी केंद्र सरकारला राजीनामा दिला होता.

नवी दिल्ली- आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरून मोदी सरकारमधून बाहेर पडलेल्या तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) शुक्रवारी एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा केली. लोकसभेत सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्तावाची नोटीसही दिली. आधीच वायएसआर काँग्रेसनेही अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, लोकसभेत गोंधळ सुरू राहिल्याने तो मांडला गेला नाही. गोंधळात अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केले.


गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात मोदी सरकारविरुद्ध प्रथमच अविश्वास ठराव दाखल झाले आहेत. मात्र, या ठरावांमुळे सरकारला कोणताही धोका नाही. लोकसभेत एकट्या भाजपचे 
२७३ सदस्य असून ते बहुमतापेक्षा अधिक आहेत. 

 

गोंधळामुळे रखडले
नियम :
अविश्वास ठराव मांडण्यासाठी संबंधित ठरावाला किमान ५० खासदारांचा पाठिंबा आवश्यक असतो. टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसची सदस्य संख्या यापेक्षा कमी आहे. ठरावास मंजुरी देताना लोकसभा सभापती संबंधित सदस्यांना उभे राहण्यास सांगतात व संख्या मोजतात.


वायएसआर काँग्रेसने दिली नोटिस 
- आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न मिळाल्याने नाराज वायएसआर काँग्रेसने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्याची नोटिस दिली आहे. वायएसआर काँग्रेसचे विरोधक टीडीपीनेही त्याला पाठिंबा दर्शवला आहे. 
- जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर मोदी सरकारच्या विरोधात हा पहिला अविश्वास ठराव असेल. 
- वायएसआर काँग्रेसचे खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी लोकसभा सचिवालयात शुक्रवारी कामकाजात अविश्वास प्रस्तावासाठी नोटिस दिली होती. 


शिवसेनेही केली आहे घोषणा  
- यापूर्वी 23 जानेवारीला एनडीए आणि भाजपचे जुना सहकारी पक्ष शिवसेनेने 2019 ची सार्वत्रिक निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. 
- पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते की, 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना NDA बरोबर नव्हे तर स्वतंत्र निवडणूक लढवेल. 
- काही महिन्यांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये थणाव आहे. शिवसेना सरकारला अनेक मुद्द्यांवर जोरदार विरोध करत आहे. मात्र सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...