आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्येला वाचवण्यासाठीच ‘पीएनबी’वर जेटली गप्प; राहुल गांधी यांच्याकडून अारोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सुमारे १२,६०० काेटींच्या पीएनबी घोटाळ्यात आपल्या वकील कन्येस वाचवण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली गप्प आहेत, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. आरोपींशी संबंधित इतर लॉ फर्मवर छापेमारी झाली असताना या प्रकरणात त्यांच्या मुलीच्या कंपनीवर का छापे मारण्यात आले नाहीत, असा सवाल राहुल यांनी एका ट्विटमध्ये केला आहे. 


राहुल म्हणाले, घोटाळा उघड होण्याच्या महिनाभराआधी जेटलींच्या कन्येला आरोपीकडून मोठी फीस देण्यात आली होती. सीबीआयने आरोपींशी संबंधित इतर विधी सल्लागार कंपन्यांवर धाडी घातल्या. मात्र, जेटलींच्या कन्येच्या कंपनीवर धाड का टाकली नाही? या ट्विटसोबत त्यांनी एक न्यूज वेबसाइटचे ट्विटही जोडले आहे. त्या वेबसाइटने प्रकरणाच्या पडताळणीसाठी जेटलींची कन्या व जावई जयेश बक्षींच्या फर्मला काही प्रश्न पाठवले. उत्तरात बक्षींनी डिसेंबर २०१७ मध्ये फीस मिळाल्याचे कबूल केले होते. ते पैसे जानेवारी २०१८ मध्ये परत केल्याचेही सांगितले.

बातम्या आणखी आहेत...