आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Chief Justice Appointed Himself A Five judge Bench To Hear The Impeachment On The Top

सरन्यायाधीशांनी स्वत:वरील महाभियोगावर सुनावणीसाठी पाच जजचे घटनापीठ स्थापले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सरन्यायाधीश दीपक मिश्रा व सुप्रीम कोर्टात दुसरे सर्वात वरिष्ठ न्यायमूर्ती चेलमेश्वर यांच्यातील दरी वाढत आहे. सरन्यायाधीशांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव रद्द करण्यास आव्हान देणारी याचिका सोमवारी न्या. चेलमेश्वरांसमोर आली. त्यावर सुनावणीसाठी त्यांनी मंगळवारी १०.३० ची वेळ मुक्रर केली.

 

हे वृत्त येताच सरन्यायाधीशांनी संध्याकाळी ७.३० वाजता प्रकरण ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवले. मंगळवारी न्या. सिकरी, एस.ए. बोबडे, एन.व्ही. रमण्णा, अरुण मिश्रा व आदर्श गोयल सुनावणी करतील. ज्येष्ठतेत हे जज ६ ते १० व्या क्रमांकावर आहेत. २ ते ५ व्या क्रमांकाचे ज्येष्ठ न्या. चेलमेश्वर, गोगोई, लोकूर व जोसेफना सुनावणीपासून लांब ठेवले. यांनीच मिश्रांविरुद्ध पत्रकार परिषद घेतली होती. महाभियोग नोटीस फेटाळल्याविरुद्ध २ काँग्रेस खासदारांनी याचिका दाखल केली. 

 

* न्या. चेलमेश्वरनी सिब्बलना आज सकाळी १०.३० वाजता बोलावले होते, आता याच वेळी घटनापीठ सुनावणी करणार

* राज्यसभा सभापतींनी रद्द केली होती महाभियोगाची नोटीस, काँग्रेसच्या २ खासदारांनी निकालाला कोर्टात दिले आव्हान

 

> न्या. चेलमेश्वर - सरन्यायाधीश मास्टर ऑफ रोस्टर, त्यांच्याकडे जा

काँग्रेस खासदारांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी न्या. चेलमेश्वर, एस.के. कौल यांच्या पीठासमोर प्रकरण तत्काळ बोर्डावर घेण्याची मागणी केली.  अॅड. प्रशांत भूषणही त्यांच्यासोबत होते. २० मिनिटे सुनावणी चालली.

 

सिब्बल : गैरवर्तन सिद्ध झाले नाही म्हणून राज्यसभेच्या सभापतींना महाभियोग प्रस्ताव रद्द करता येत नाही. 

न्या. चेलमेश्वर : प्रकरण बोर्डावर घेण्यासाठी तुम्ही सरन्यायाधीशांकडे जा. त्यांच्याकडेच ‘मास्टर ऑफ रोस्टर’चे अधिकार आहेत.
सिब्बल : पण नोटीस त्यांच्याच विरुद्ध आहे.  अशा स्थितीत ज्येष्ठ न्यायाधीशच निर्णय घेऊ शकतात.                         

न्या चेलमेश्वर : पण येथे माझे काहीच दिवस शिल्लक आहेत.
सिब्बल : आजवर अशी स्थिती निर्माण झाली नाही. याचिकेमुळे घटनात्मक प्रश्न उभे राहतात.
न्या. कौल : या प्रकरणाला सरन्यायाधीशांकडे नेलेले बरे. 
प्रशांत भूषण : राज्यसभा सभापतींच्या निर्णयावरील विरोधातील याचिकेवर ज्येष्ठ न्यायाधीशच आदेश देऊ शकतात. जस्टिस चेलमेश्वर : यावर विचार करण्यासाठी मंगळवारी सकाळी १०.३० वाजता सुनावणी घेऊ.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...