आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Encounter Took Place In The Face, The Jaw, The Lips Went Away; The Doctor Is Now Seeing The Face Of The Photo Being Done

चकमकीत चेहऱ्यावर गोळी लागली, जबडा, ओठ गेले; डॉक्टर आता फोटो पाहून घडवताहेत चेहरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मेजर ऋषी नायर एक वर्षापूर्वी काश्मीरच्या त्राल भागात १६ तास चाललेल्या चकमकीत जखमी झाले होते. ४ मार्च २०१७ रोजी दोन दहशतवादी त्रालमध्ये एका घरात घुसले. लष्कराने कारवाई सुरू केली. मेजर ऋषींकडे नेतृत्व होते. या चकमकीत ऋषींच्या चेहऱ्यावर गोळी लागली. चकमकीत दोन्ही अतिरेकी मारले गेले. मात्र, ऋषी यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. गोळी लागल्यावर ४० मिनिटांपर्यंत ऋषी शुद्धीवर होते. त्यांना तातडीने श्रीनगर व नंतर दिल्लीला हलवण्यात आले. 


ऋषी यांचा निम्मा ओठ, जबडा, डोळ्याजवळील हाड आणि उजव्या बाजूचे नाक पूर्णत: तुटले होते. त्यांची प्रकृती उत्तम असली तरी चेहरा मात्र विद्रूप झाला आहे. त्यांना जास्त बोलता येत नाही. लिहूनच ते संवाद साधतात. लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत त्यांच्यावर १२ तासांंच्या सहा शस्त्रक्रिया झाल्या आहेत. आणखी काही शस्त्रक्रिया होतील. त्यांच्या चेहऱ्याला मूळ रूप देण्याचे प्रयत्न डॉक्टर कसोशीने करत आहेत. यासाठी डॉक्टर त्यांचा मूळ फोटो पाहून चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करतात. त्यांना मूळ चेहरा मिळवून देऊ, असा विश्वास डॉक्टरांना आहे. विशेष म्हणजे चकमकीनतंर चार महिन्यांत ऋषी पुन्हा कामावर हजर होते. सध्या त्यांना दिल्लीत पोस्टिंग देण्यात आली आहे. वार्तांकन : उपमिता वाजपेयी

 

> मी शब्द दिला होता की जोवर जिवंत आहे तोवर माझे जवान स्वत:च्या पायावर घरी परततील. तो शब्द मी पाळला.

- मेजर ऋषी

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, विचित्र चेहरा पाहून कुणाला त्रास होऊ नये म्हणून मेजर ऋषी आता मास्क घालून ऑफिसला जातात...  

बातम्या आणखी आहेत...