आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील डीएनए फिंगरप्रिंट तंत्रज्ञानाचे जनक डॉ. लालजी सिंह वयाच्या 70 व्या वर्षी कालवश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- वैज्ञानिक लाल सिंह यांचे रविवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. विज्ञानाच्या क्षेत्रात लालजी यांनी अनेक संशोधने केली. याच बळावर त्यांना ओळख मिळाली. ते बनारस विद्यापीठाचे कुलगुरूही होते. २००४ मध्ये पद्मश्रीने सन्मानित झाले. डीएनए फिंगरप्रिंट तंत्रज्ञानासाठी त्यांना सर्वाधिक आठवले जाईल. १९९१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवणे कठीण होेते. सर्व उपाय निकामी ठरल्यानंतर डॉ. सिंह यांनीच डीएनए फिंगरप्रिंट तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला दिला.

 

त्यांच्याच निर्देशांवरून प्रियंका गांधी यांच्या नखाचा नमुना घेण्यात आला आणि त्याचा डीएनए मृतदेहाच्या डीएनएशी जोडून पाहिला. त्यावरून ओळख पटली. म्हणूनच सिंह यांना भारतातील डीएनए फिंगरप्रिंट तंत्रज्ञानाचे जनक म्हटले जाते. डॉ. सिंह यांनी मानवी डीएनएशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण संशोधनही केले. १९९८ पर्यंत भारतात डीएनए निदानाची कोणतीही व्यवस्था नव्हती. अर्थात एखाद्या व्यक्तीला वांशिक आजार असेल तर त्यावर उपचार करणे शक्य नव्हते. लालजी सिंह यांनी याचा अभ्यास करून डीएनए निदानाची पद्धत शोधून काढली. १९८७ मध्ये त्यांनी फेलोशिपच्या माध्यमातून एडिनबर्ग विद्यापीठातून संशोधन पूर्ण केले. त्यापूर्वी बीएचयूमधून अनुवंशशास्त्राचे शिक्षण घेतले. ऑगस्ट २०११ मध्ये ते त्याच बीएचयूचे कुलगुरू बनले. या काळात ते फक्त १ रुपया वेतन घ्यायचे. जौनपूरमध्ये जन्मलेले लालजी सिंह यांचे पार्थिव वाराणसीत आणून मर्णिकर्णिका घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

डीएनए फिंगरप्रिंट तंत्रज्ञानाने देशातील गुन्हेविषयक तपासाची संपूर्ण प्रक्रियाच बदलून टाकली
डॉ. लालजी सिंह यांनी १९८८ मध्ये डीएनए फिंगरप्रिंट तंत्रज्ञानाचा शोध लावला. त्यामुळे भारतातील गुन्हेविषयक तपासाच्या संपूर्ण प्रक्रियेला नवी दिशा मिळाली. हत्येची अनेक प्रकरणे उघडकीस आली. राजीव गांधी खटल्यापासून दिल्लीचे नैना साहनी तंदूर प्रकरण, उत्तर प्रदेशाातील मधुमिता आणि प्रियदर्शिनी मट्टू हत्याकांडाचे रहस्य उलगडण्यात या तंत्रज्ञानाची मदत झाली.

बातम्या आणखी आहेत...