आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून; सरकार ट्रिपल तलाकसह मांडणार 25 विधेयके

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- संसदेचे हिवाळी अधिवेशन शुक्रवारपासून सुरू होणार आहे. त्यात गदारोळ होणार हे निश्चित आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर गुजरात निवडणुकीसाठी कट रचल्याचा आरोप, मतदानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आणि अधिवेशन बोलावण्यास झालेला उशीर हे मुद्दे विरोधक उपस्थित करतील, अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे सरकार या अधिवेशनात २५ विधेयके सादर करणार आहे. त्यात तीन तलाक हा अजामीनपात्र गुन्हा बनवण्याच्या आणि तो देणाऱ्यास तीन वर्षांची शिक्षा देण्याशी संबंधित विधेयकाचा समावेश आहे.


संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंग, माजी लष्कर प्रमुख दीपक कपूर, माजी मुत्सद्दी आणि देशाच्या महत्त्वाच्या पदांवर राहिलेल्या व्यक्तींवर आरोप केले आहेत. चुकीच्या आरोपांबद्दल मोदींनी माफी मागावी. ते म्हणाले की, मोदींचे लक्ष फक्त निवडणुकीवर आहे. संसद आणि लोकशाहीला त्यांची प्राथमिकता नाही. निवडणूक आयोग सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहे. दुसरीकडे मोदी यांनी बैठकीत लोकसभा आणि विधानसभा एकत्र घेण्यासाठी एकमत तयार करण्याची विनंती केली. अनंतकुमार म्हणाले की, अधिवेशनात २५ विधेयके सादर केली जातील. गेल्या तीन वर्षांत संसदेत ९० ते ९५ टक्के कामकाज झाले आहे. या वेळीही असेच होईल, अशी अपेक्षा आहे. 

 

मनमोहनसिंग यांनी घेतली व्यंकय्या नायडूंची भेट 
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी गुरुवारी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. नायडू यांनी ट्विटरवरून या भेटीची माहिती दिली. मनमोहनसिंग हे राज्यसभेचे सदस्य आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी सिंग यांनी पाकिस्तानशी हातमिळवणी केली आहे, असा आरोप या आठवड्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. सिंग यांनी त्यावर मोदी खोटे बोलत आहेत, असे प्रत्युत्तर दिले होते. विरोधी पक्ष हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याची शक्यता आहे.

 

एक महिना उशिरा अधिवेशन

हिवाळी अधिवेशन एक महिना विलंबाने सुरू होत आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. गेल्या हिवाळी अधिवेशनात २४ दिवस कामकाज झाले होते. या वेळी फक्त १४ दिवसच काम होईल. अधिवेशन ५ जानेवारीला संपणार आहे.


कामकाज सुरळीत व्हावे

नायडू  संसदेतील कामकाज शांततेत पार पडावे याची काळजी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांनीही घ्यावी, अशी अपेक्षा राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. राज्यसभा टीव्हीशी बोलताना नायडू म्हणाले की,  विरोधी पक्षांना म्हणणे मांडू द्यावे आणि सरकारनेही त्यांचे एेकून घेऊन त्यावर प्रतिसाद द्यावा. 

 

हेही वाचा, 
मतदानानंतर माेदींच्या राेड शाेवर भडकलेल्‍या काँग्रेसने निवडणूक अायाेगावर केले अाराेप

 

बातम्या आणखी आहेत...