आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • टाइमच्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या लिस्टमध्ये विराटसहित 4 भारतीय TIME Magazines 100 Most Influential People Deepika And Kohli Among List

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टाइमच्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या लिस्टमध्ये विराटसहित 4 भारतीय, हुकूमशहा किम जोंगलाही स्थान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टाइमच्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत विराटसह 4 भारतीय. - Divya Marathi
टाइमच्या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत विराटसह 4 भारतीय.

नवी दिल्ली/वॉशिंग्टन - अमेरिकेच्या टाइम मॅगझिनने गुरुवारी जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जारी केली आहे. यात भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली, अॅक्ट्रेस दीपिका पादुकोण, कॅब कंपनी ओलाचे को-फाउंडर भाविश अग्रवाल आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना स्थान मिळाले आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही या यादीत सामील करण्यात आले आहे. विशेष बाब अशी की, या वेळी 45 चेहरे असे आहेत, ज्यांचे वय 40 पेक्षाही कमी आहे. 

 

नॉर्थ कोरियाचा हुकूमशहाही यादीत
- वृत्तसंस्थेनुसार, मॅगझिनने या वेळी अॅक्ट्रेस निकोल किडमन, प्रिन्स हॅरी आणि त्यांची वाग्दत्त वधू मेगन मार्कल, लंडनचे मेयर सादिक खान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, सौदी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, नॉर्थ कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन, आयर्लंडचे पंतप्रधान लियो वराडकर, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आणि सिंगर रिहाना यांना प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांमध्ये स्थान दिले आहे.

 

प्रभावशाली व्यक्तींपैकी 45 जणांचे वय 40 पेक्षाही कमी
- टाइम मॅगझिनकडून सांगण्यात आले की, 2018 च्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सर्वात जास्त 45 असे आहेत, ज्यांचे वय 40 वर्षांहून कमी आहे. यात 14 वर्षीय अॅक्टर मिल्ली बॉबी ब्राऊनही सामील आहे.

 

महिलांना मिळाले जास्त स्थान
- जगभरात महिलांच्या नेतृत्वातील वाढत असलेली भागीदारी पाहून मॅगझिनने या वर्षी जास्त महिला लिस्टमध्ये सामील केले. यात समाजसेविका तराना बुर्के (Mee Tooच्या फाउंडर), सिंगर जेनिफर लोपेज, चलोई किम, अंतराळयात्री पेग्गी विटसन यांनाही स्थान मिळाले.

 

कोहलीने गतवर्षी 2818 रन, 11 शतके लगावली
- सचिनने विराटच्या प्रोफाइलमध्ये लिहिले- ''यांच्यात धावांची भूक आहे आणि त्यांनी ती कायम ठेवली आहे. हीच त्यांच्या खेळाची ओळख बनली आहे. 2008 च्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये कोहलीने भारतीय टीमचे नेतृत्व केले. ही टूर्नामेंट नव्या प्रतिभांना संधी मिळण्यासाठी महत्त्वाची असते. यादरम्यान मी पहिल्यांदा विराटला खेळताना पाहिले.''
- तथापि, कोहलीने गतवर्षी सर्व फॉर्मेटमध्ये 2818 धावा केल्या आणि 11 शतकेही केली.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...