आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोण आहे डायना हेडन? हिचे सौंदर्य भाजप CM बिप्लव देवांच्या नजरेला खटकले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी डायन हेडनबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. (फाइल) - Divya Marathi
मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी डायन हेडनबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. (फाइल)

नवी दिल्ली - डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या त्रिपुरामध्ये भाजपचा झेंडा फडकवून मुख्यमंत्री झालेले बिप्लव देव हे त्यांच्या कामापेक्षा वादग्रस्त वक्तव्यामुळेच अधिक चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी सौंदर्यवतींची तुलना करुन वाद ओढवून घेतला आहे. मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी मिस वर्ल्डचा किताब जिंकणाऱ्या डायना हेडनमध्ये मला कोणतेच सौंदर्य दिसत नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याचवेळी त्रिपुराचे सर्वाधिक तरुण मुख्यमंत्री बिप्लव देव यांना ऐश्वर्या रॉयच्या सौदर्याचे कौतूक केले आहे. ती खऱ्या अर्थाने भारतीय महिलांचे प्रतिनिधीत्व करते असे ते म्हणाले. 

 

काय म्हणाले CM बिप्लव देव 
- मुख्यमंत्री बिप्लवकुमार देव याचे म्हणणे आहे, की डायना हेडन कोणत्या अर्थाने सुंदर आहे हे मला कळत नाही. 
- मुख्यमंत्री देव यांनी डायनाच्या सौंदर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तसेच त्यांनी ब्यूटी कॉन्टेस्टच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित केला आहे. 

 

आता एक नजर डायना हेडनच्या प्रोफाइलवर... 
- डायना हेडनने 1997 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. त्याआधी तिने फेमिना मिस इंडिया स्पर्धा जिंकली होती. 
- मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी डायना ही तिसरी भारतीय महिला होती. तिच्या आधी रिता फारिया आणि ऐश्वर्या रॉय यांनी हा किताब जिंकला होता. 
- डायना बऱ्याच काळापासून लाइमलाइटपासून दूर आहे.
- डायना हेडन 2008 मध्ये रियालिटी शो बिग बॉस-2मध्ये सहभागी झाली होती. या शोमध्ये तिची वाइल्ड कार्ड एंट्री झाली होती. 
- डायनाचा जन्म हैदराबादमध्ये झाला होता. ती अँग्लो-इंडियन आहे. तिने लंडनमधून अॅक्टिंगचे ट्रेनिंग घेतले होते. 
- मॉडेलिंगला सुरुवात करण्यापूर्वी डायनाने इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसोबत काम केले होते. त्यानंतर तिने एका कंपनीत पीआर ऑफिसर म्हणूनही काम केले होते. 
- डायनाने A Beautiful Guide नावाने एक पुस्तकही लिहिले आहे. त्यामध्ये तिने व्यक्तीमत्व विकास आणि आत्मविश्वास कसा वाढवायचा याची चर्चा केली आहे. 
- 2013 मध्ये डायनाने कॉलिन जिकसोबत लग्न केले. 2016 मध्ये तिने एका मुलीला जन्म दिला आहे. 

बातम्या आणखी आहेत...