आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानाेत्तर चाचणीत त्रिपुरामध्ये भाजपला काैल;मेघालय-नागालँडमध्येही स्थिती भक्कम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पूर्वोत्तर तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर घेण्यात आलेल्या मतदानाेत्तर चाचणीत (एक्झिट पाेल) त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्ष कम्युनिस्टांचे सरकार उलथून टाकण्याची चिन्हे आहेत, तर मेघालय व नागालँडमध्येही भाजप प्रमुख पक्ष म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. 

 

पूर्वोत्तर नागालँड आणि मेघालय राज्यांत  विधानसभा निवडणुकांसाठी मंगळवारी मतदान झाले. नागालँडमध्ये ७५ % आणि मेघालयात ७५ टक्के मतदान झाले. या वेळी दोन्ही राज्यांत गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचे प्रमाण घटले आहे. २०१३ मध्ये मेघालयात ८९% मतदान झाले होते. निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन्ही राज्यांत मतदानात काही प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ३ मार्च राेजी या राज्यांत मतमाेजणी हाेणार अाहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, त्रिपुरा, मेघालय अाणि नागालँड राज्‍यांची मतदानाेत्तर चाचणी...

बातम्या आणखी आहेत...