आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोयडात झाडावर लटकलेल्या अवस्थेत मिळाले सख्ख्या बहिणींचे मृतदेह, नातेवाईकावर आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक नातेवाईक मोठ्या मुलीशी लग्नासाठी दबाव आणत होता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. - फाइल - Divya Marathi
एक नातेवाईक मोठ्या मुलीशी लग्नासाठी दबाव आणत होता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. - फाइल

नोयडा - दिल्लीला लागून असलेल्या नोयडातील सेक्टर 49 मध्ये मंगळवारी सकाळी 2 बहिणींचे मृतदेह झाडाला लटकत असलेल्या अवस्थेत आढळून आले. ही हत्या आहे की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोटही आढळलेले नाही. कुटुंबीयांनी दूरच्या एका नातेवाईकावर मुलींच्या हत्येचा आरोप केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या मुलींचे आत्येभाऊ अनेकदा रात्रीच्यावेळी येऊन मारण्याची धमकी देऊन जात होते. या घटनेमुळे बरोला गावात दहशतीचे वातावरण आहे. 


घराबाहेर लटकलेल्या अवस्थेत मिळाले बहिणींचे मृतदेह. 
नोयडाचे अधीक्षक अरुण कुमार यांनी सांगितले की, सेक्टर 49 च्या बरोला गावात सकाळी 13 आणि 18 वर्षांच्या सख्ख्या बहिणींचे मृतदेह घराबाहेर झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. सुसाइड नोट सापडलेले नसून पोलिस हत्या आणि आत्महत्या असा दोन्ही बाजुने तपास करत आहेत. 


मुलींच्या कुटुंबीयांचता आरोप.. 
मृतदेह आढळलेल्या मुलींच्या कुटुंबीयांनी लांबच्या एका नातेवाईकावर हत्येचा आरोप केला आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले की, नातेवाईक आधीपासूनच विवाहित आहे. तरीही मोठ्या मुलीशी लग्न करण्यासाठी तो दबाव आणत होता. घटनेच्या आधी सायंकाळी त्याने घरी येऊन गोंधळ घातला होता. तसेच धमकीही दिली होती. मंगळवारी पहाटे जेव्हा वडील झोपेतून उठले तेव्हा मुली घरात नव्हत्या. त्यांनी दरवाजा उघडून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला पण कोणीतरी मेन गेट बाहेरून लॉक केले होते. 


शरिरावर मारहाणीचे व्रण नाही 
गौतमबुद्धनगरचे एसएसपी लव्ह कुमार म्हणाले की, पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट येण्याची वाट पाहत आहेत. त्यानंतर ही हत्या ाहे की आत्महत्या याबाबत सांगता येईल. प्राथमिक तपासात मुलींच्या शरिरावर मारहाणीचे व्रण दिसले नाहीत. 

 

 

बातम्या आणखी आहेत...