आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यू अँड आय वॉल्ट्स लिमिटेडवर IT चा छापा, ज्वेलरी-रोख रकमेसह 85.2 कोटी जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इनकम टॅक्स (आयटी) डिपार्टमेंटने यू अँड आय वॉल्ट्स लिमिटेडवर टाकलेल्या छाप्यात 8 कोटी रुपये नगद आणि ज्वेलरीसह 85.2 कोटींचे साहित्य जप्त केले आहे. न्यूज एजन्सीने आयटी डिपार्टमेंटच्या सूत्रांच्या माहितीनुसार म्हटले आहे, की या ग्रुपवर गेल्या आठ दिवसांपासून कारवाई सुरु आहे. 

 

कंपनीला ठोकले सील 
- आयटी डिपार्टमेंटने छापेमारीनंतर साऊथ एक्स येथील लॉकर कपंनी यू अँड आय वॉल्ट्स लिमिटेड सील केले आहे. 
- दिल्लीतील ही सर्वात सेफ डिपॉझिट वॉल्ट कंपनी मानली जाते. याचा वापर अनेक मोठमोठे उद्योगपती करतात. या कंपनीची स्थापना 1947 मध्ये झाली होती. दिल्ली, गुडगावसह कंपनीचे अनेक ठिकाणी ऑफिस आहेत. त्यासोबतच देशभरात त्यांचे नेटवर्क आहे. 

यामुळे झाली कारवाई 
- नोटबंदीनंतर आयकर रिटर्न आणि कॅश डिपॉझिट संदर्भात विविध माहिती समोर येत होती. ही माहिती बँकांनी आयटी डिपार्टामेंटला शेअर केली. त्याआधारावरच कारवाई केली जात असल्याचे आयटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 
- दुसरीकडे एका अधिकाऱ्याने नोटबंदीनंतर काळेधन शोधून काढण्याचेच हे प्रकरण असल्याचे म्हटले आहे. 

 

लोक यामुळे करतात लॉकरचा उपयोग
- लॉकर उघडण्यासाठी कोणतेही अकाऊंट उघडण्याची किंवा कागदपत्रांची पूर्तता करावी लागत नाही. फार कमी कागदपत्रांच्या आधारी लॉकर सुविधा मिळते. 
- लॉकरचा कोणताही रेकॉर्ड राहात नाही. त्यासोबतच सरकारकडेही याची कोणतीही माहिती नसते. 
- रात्री 10 वाजता पर्यंत लॉकरचा वापर करता येतो. दुसरे असे की वर्षातील 365 दिवस लॉकर सुविधा उघडी असते. 
- एका दिवसातून कितीही वेळा तुम्ही लॉकरचा उपयोग करु शकता. त्यासाठी फारवेळ प्रतिक्षेतही उभे राहावे लागत नाही. 
- लॉकर वापरण्यासाठी लोकांना 1200 पासून 15 हजार रुपयांपर्यंत वार्षिक चार्ज द्यावा लागतो. 

 


सरकारी आणि खासगी बँकांचे लॉकर सुविधा 
- बहुतेक बँका या लॉकर सुविधा घेऊ इच्छाणाऱ्या ग्राहकांना अकाऊंट उघडण्याचा दबाव टाकतात. वास्तविक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार असे करणे गरजेचे नाही. मात्र बँकांमध्ये लॉकर उघडण्यासाठी खूप खेटे घालावे लागतात. 
- बँकेमध्ये प्रत्येक रेकॉर्ड ठेवले जाते. आधार, पॅन सारख्या क्रमांकामुळे सरकारकडे माहिती राहाते. 
- बँका या निश्चित वेळेत उघडतात आणि बंद होतात. विकेंडला सुटी आणि वर्षातील सार्वजनिक सुटीच्या दिवशी बँक बंद असते. 
- बँकामधील लॉकर सुविधेचा वापर करायचा असल्यास कित्येक तास वाट पाहात थांबावे लागते. 
- बहुतेक बँका या वर्षातून फक्त 12 वेळाच लॉकरचा वापर करु देतात. त्यापेक्षा जास्त वापर केला तर त्यावर चार्ज आकारला जातो. 
- स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लॉकर घेण्यासाठी 800 ते 8000 रुपये वार्षिक चार्ज आकारला जातो.

 

देशभरात आतापर्यंत 3500 कोटींची संपत्ती जप्त 
- देशात 1 नोव्हेंबर 2016 ला बेनामी संपत्तीचा कायदा लागू झाला आहे. त्यानंतर आतापर्यंत देशभरातील बेनामी संपत्तीवर कारवाई सुरु आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत 3500 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. 

 

हेही वाचा... 
निनावी 3500 Cr मालमत्तेवर इनकम टॅक्सची टाच, 900 पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये अॅक्शन

 

बातम्या आणखी आहेत...