आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराझांसी - राम मंदिर आंदोलनातील सक्रिय नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी यापुढे निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. झांसीच्या जनतेने खूप प्रेम आणि स्नेह दिला आहे, त्यांच्या ऋणात राहू इच्छिते असे सांगत आरोग्याच्या कारणामुळे यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चालण्या-फिरण्यासही त्रास होतो
- उमा भारती यांनी मीडियासोबत बोलताना म्हटले आहे, की कंबर आणि घुडघे दुखीचा त्रास वाढला आहे. चालण्या-फिरण्यासही त्रास होत आहे. त्यामुळे मी निर्णय घेतला आहे की आता यापुढे निवडणूक लढवायची नाही. 2019 ची लोकसभाही मी लढवणार नाही. झांसीच्या जनतेचे जे प्रेम आणि स्नेह मिळाला आहे त्यांची ऋणात मी राहिल.
आता फक्त प्रचार करणार
- उमा भारती म्हणाल्या, 'भाजपचे जेव्हा फक्त दोन खासदार होते तेव्हापासून आता पक्ष पूर्ण बहुमताने केंद्रात सत्तेत आहे. या संपूर्ण प्रवासात मी पक्षासोबत होते. काम करत होते. पक्षासाठी अनेक वर्ष कठोर मेहनत केली. 54व्या वर्षी आता शरीर पहिल्यासारखी साथ देत नाही. मला आनंद आहे की भाजप सध्या देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे.'
- मध्यप्रदेश विधानसभेची यावर्षी निवडणूक होणार आहे. त्याबद्दल उमा म्हणाल्या, 'विधानसभा निवडणुकीत माझी भूमिका फक्त प्रचारकाची राहिल. मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसेल आणि उमेदवारही नसेल.'
आगामी पंतप्रधानही नरेंद्र मोदी
- अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्याबद्दल उमा भारती म्हणाल्या, कोर्टाच्या निर्णयाआधी त्यावर काही बोलणार नाही. मला विश्वास आहे की आगामी लोकसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील.
मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री होत्या उमा भारती
- उमा भारती यांचा जन्म 3 मे 1959 ला मध्यप्रदेशातील टीकमगड जिल्ह्यात झाला.
- साध्वी ऋतम्भरासोबत त्यांनी राम मंदिर आंदोलनात सहभाग घेतला. त्यात प्रमुख भूमिका निभावली.
- वाजपेयी सरकारमध्ये त्या मनुष्यबळ विकास, पर्यटन, क्रीडा मंत्री होत्या.
- उमा भारती यांच्या नेतृत्वात 2003 मध्ये मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्यात आली. ऑगस्ट 2004 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये त्यांना सुरुवातीला गंगा स्वच्छता मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. नंतर ती जबाबदारी काढून घेण्यात आली. त्यानंतर स्वच्छता आणि पेयजल मंत्री करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.