आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
दाऊद राजनच्या मागावर
1993च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर छोटा राजन दाऊदपासून वेगळा झाला होता. त्यानंतर दाऊदने अनेकदा छोटा राजनची हत्या करण्याचा प्रयत्न केला. 2000 साली बँकाकमध्ये तर छोटा राजन हल्ल्यात थोडक्यात बचावला होता. या हल्ल्यादरम्यान राजनचा पाय मोडला होता व त्याला तेथील एका रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र चोख पोलिस बंदोबस्त असूनही राजन तेथून निसटण्यात यशस्वी झाला होता.
यानंतर 2015मध्ये इंडोनेशिया पोलिसांनी छोटा राजनला अटक करुन भारताच्या स्वाधीन केले होते. दाऊदपासून संरक्षण व्हावे म्हणून छोटा राजनला महाराष्ट्रातील तुरुंगात न ठेवता दिल्लीतील तिहारसारख्या अतिसुरक्षित तुरुंगात ठेवण्यात आले. मात्र याच तरुंगात कैदेत असलेल्या बवाना या स्थानिक गुंडाच्या मदतीने दाऊदने छोटा राजनला ठार मारण्याचा कट रचल्याची माहिती दोन आठवड्यांपूर्वी पोलिसांना मिळाली. त्यानंतर बवानाला ताबडतोब दुसरीकडे हलवण्यात आले. सध्या त्याला हाय रिस्क वॉर्डात ठेवण्यात आले आहे. त्याच्या बराकीतून मोबाईलही जप्त करण्यात आले होते.
षड्यंत्राची माहिती मिळाल्यानंतर छोटा राजनची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली असून त्याच्या सुरक्षेला सर्वाच्च प्राधान्य देण्यात आल्याचे तिहार प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर राजनसाठी विशेष सुरक्षा पथक व वेगळे स्वयंपाकीही ठेवण्यात आले आहेत.
सामान्य कुटुंबातील राजेंद्र सदाशिव निकाळजे कसा बनला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन...वाचा पुढील स्लाइडवर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.