आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Union Minister Of State For Home Hansraj Ahir Said Will Fire 10 Bullets In Response To One

पाकिस्तानच्या एका गोळीला 10 गोळ्यांनी प्रत्यूत्तर, शस्त्रसंधीवर केंद्र सरकारची कडक भूमिका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानकडून होत असलेल्या फायरिंगमध्ये शुक्रवारी आपले दोन जवान शहीद झाले. - Divya Marathi
पाकिस्तानकडून होत असलेल्या फायरिंगमध्ये शुक्रवारी आपले दोन जवान शहीद झाले.

मुंबई/नवी दिल्ली - बॉर्डरवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे, त्यावर भारताने कडक भूमिका घेतली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर म्हणाले, आम्ही पहिली गोळी चालवत नाही, मात्र एका गोळीला 10 गोळ्यांनी उत्तर दिले जाईल. एलओसीवर गुरुवारपासून फायरिंग होत आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या फायरिंगमध्ये शुक्रवारी आपले दोन जवान शहीद झाले, दोन नागरिकांचा या फायरिंगमध्ये मृत्यू झाला. 

 

भारतात दहशतवादी पाठवणे त्यांची सवय 
- महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात शुक्रवारी रात्री मीडियासोबतच्या बातचीतमध्ये गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. 
- अहिर म्हणाले, 'भारतात दहशतवादी पाठवणे आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे ही पाकिस्तानची सवय आहे. त्यांच्याविरोधात होम आणि डिफेन्स मिनिस्ट्री एकत्र येऊन जम्मू-काश्मीर पोलिसांसह काम कर आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक हलचालीवर नजर असून त्यांना तोडीसतोड उत्तर दिले जात आहे.'

 

पहिली गोळी सोडणार नाही पण... 
- एका प्रश्नाच्या उत्तरात अहिर म्हणाले, याबद्दल भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आधीच स्पष्ट केले आहे. 
- अहिर म्हणाले, कधीही आम्ही पहिली गोळी सोडणार नाही. मात्र पाकिस्तानकडून एक गोळी आली तरी त्या बदल्यात भारताच्या 10 गोळ्यांनी उत्तर दिले जाईल. 

बातम्या आणखी आहेत...