आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्नाव प्रकरणी आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्याविरोधात CBI ने दाखल केले Chargesheet

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उन्नाव सामुहित बलात्कार प्रकरणी अखेर भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्या विरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. कुलदीप सेंगर हे सध्या सितापूर तुरुंगात आहेत. गेल्या आठवड्यात सीबीआयने पीडितेच्या वडिलांच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. त्या सेंगर यांच्या भावांसह पाच जणांच्या नावाचा समावेश होता. 

 

पीडित तरुणी 4 जून 2017 रोजी उत्तर प्रदेशातील मखी येथील आरोपींच्या घरी सहकारी शशी बरोबर गेली होती. त्यावेळी तिच्यावर त्याठिकाणी सेंगर आणि इतरांना अत्याचार केले होते. त्यावेळी शशी हा दारावर राखण देत होता, अशी माहिती समोर आली आहे. पीडितेने वारंवार विनंती करूनही स्थानिक पोलिसांनी वारंवार या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली होती. पण जेव्हा पीडितेच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला तेव्हा हे प्रकरण समोर आले होते. 


या प्रकरणानंतर देशभरातून उसळलेला जनक्षोभ पाहता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. त्यानंतर सेंगर यांच्या विरोधात कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली. तसेच पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणीही या सर्वांना दोषी धरण्यात आले आहे. पीडितेच्या वडिलांवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला होता. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. 

बातम्या आणखी आहेत...