आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या अहवालात बजरंग दल - विश्व हिंदू परिषदेला म्हटले दहशतवादी संघटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जगातील सर्वाधिक नावाजलेली गुप्तचर संस्थेपैकी एक असलेली अमेरिकेची 'सेंट्रल इंटेलिजेन्स एजन्सी' (सीआयए) ने विश्व हिंदू परिषद (व्हिएचपी) आणि बजरंग दल या संघटनांना धार्मिक दहशतवादी संघटना म्हटले आहे. सीआयएने आपल्या वर्ल्ड फॅक्टबुकमध्ये या दोन्ही संघटनांना राजकीय दबाव गट (पॉलिटिकल प्रेशर ग्रुप्स) म्हटले आहे. म्हणजे प्रत्येक्ष राजकारणावर यांचा प्रभाव असतो मात्र स्वतः कधी निवडणुकीच्या राजकारणात उतरत नाही.

 

राष्ट्रीय स्वयंसवेक संघ, हुर्रियत कॉन्फ्रन्स देखील राजकीय दबाव असणारे गट 
- वर्ल्ड फॅक्टबुकमध्ये सीआयएने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस), हुर्रियत कॉन्फ्रन्स, जमियत उलेमा-ए-हिंद यांनाही राजकीय दबावगट असणारे समुह म्हटले आहे. 
असे असले तरी तिन्हींची वर्गवारी वेगवेगळी करण्यात आली आहे. जिथे आरएसएसला राष्ट्रवादी संघटना म्हटले आहे, त्याचवेळी हुर्रियतला फुटीरतावादी संघटना म्हटले आहे या अहवालात महमूद मदनीच्या जमियत उलेमा-ए-हिंदला धार्मिक संघटना म्हटले आहे. 

 

जगातील 267 देशांची माहिती देते सीआयएची वर्ल्ड फॅक्टबुक 
- सीआयए दरवर्षी 4 जून रोजी वर्ल्ड फॅक्टबुक प्रकाशित करीत असते. याद्वारे गुप्तचर संस्था अमेरिकन सरकारला वेगवेगळ्या देशांचा इतिहास, तिथली सरकारे, आर्थिक स्थिती, ऊर्जा, भौगोलिक स्थिती, आणि इतर शक्तीस्थळ यांची माहिती देत असते. 
- सीआयएकडे सध्या 267 देशांची माहिती उपलब्ध आहे. अशी माहिती आहे की सीआयएने सर्व प्रथम 1962 मध्ये अशी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती. वास्तविक ही माहिती सार्वजनिक करण्यास 1975 साल उजाडले होते. 

 

भाजपच्या माजी संयोजकाने म्हटले फेक न्यूज 
- भाजप संवाद सेलचे माजी राष्ट्रीय संयोजक खेमचंद शर्मा यांनी सीआयए वर्ल्ड फॅक्टबुकजा दावा फेटाळला आहे. त्यांनी हे वृत्तच खोटं (फेक न्यूज) असल्याचे म्हटले आहे. 
- शुक्रवारी त्यांनी ट्विट करुन या तपास यंत्रणेविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. 

बातम्या आणखी आहेत...