आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट-अनुष्काने लग्नाच्या शेवटच्या फेऱ्यापर्यंत पाळली गुप्तता, असे करण्याची ही आहेत 5 कारणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सोमवारी इटलीच्या टस्कनीमध्ये विवाहबद्ध झाले. दोघांनी आपल्या बाजूने या सोहळ्याला सीक्रेट ठेवले. लग्नानंतर विराट आणि अनुष्काने ट्विट करून लग्नाची पुष्टी केली. यानंतर दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले. परंतु, कोणत्या कारणामुळे विराट आणि अनुष्काने लग्नासाठी एवढी गुप्तता पाळली. DivyaMarathi.Com तुम्हाला सांगत आहे ही 5 कारणे... 

 

1. मीडियाला मॅनेज करावे लागले असते...
- विराट आणि अनुष्काने 11 डिसेंबर रोजी इटलीच्या टस्कनीच्या एका रिसॉर्टमध्ये सात फेरे घेतले. विवाह सोहळ्यात दोघांचे कुटुंबीय आणि काही मित्र एवढेच सामील झाले होते. यासाठी त्यांना जास्त व्यवस्था करावी लागली नाही.
- विराट- अनुष्काला माहितीये की, ते सेलिब्रिटी आहेत आणि त्यांचे लग्न हायप्रोफाइल. यामुळे मीडियात याचे जबरदस्त कव्हरेज होईल. यामुळे सेरेमनीला मॅनेज करण्यासाठी अडचणी येतील. याउलट टस्कनीत त्यांना सिक्युरिटीची व्यवस्था करावी लागली आणि मीडियापासून दूर राहिले.

 

2. जास्त पाहुणे बोलवावे लागले असते...
- विराट टीम इंडियाचा कॅप्टन आहे आणि अनुष्का अॅक्ट्रेस. जर त्यांनी भारतात लग्न केले असते तर जास्त पाहुणे बोलवावे लागले असते. बहुधा ही संख्या 500च्या पुढे गेली असती. तथापि, हे मॅनेज करायला काही अडचण आली नसती. पण नंतर असे वाटले असते की, अमुक पाहुण्याला बोलवायचे राहिले. दोघांनी ही शक्यताच दूर केली. एक अडचण अशीही होती की, भारतात लग्न केले असते तर कुणाला सांगितले असते अन् कुणापासून लपवले असते. यामुळे बाहेर देशात गेले, लग्न केले आणि स्वत:च नंतर जाहीर केले.

 

3. आदित्य चोप्रा यांना मेंटॉर मानते अनुष्का
- अनुष्का आणि आदित्य चोप्रा यांच्यात चांगली मैत्री आहे. ती आदित्य यांना खासगी बाबी शेअर करते आणि त्यावर आदित्य यांचा सल्लाही घेते. आदित्यनेच त्यांना देशाबाहेर लग्न करण्याचा सल्ला दिला. यामुळे ते विनाकारण माध्यमांत येण्यापासून वाचतील. याआधीही जेव्हा एकदा विराट-अनुष्कामध्ये दुरावा आला होता तेव्हा आदित्य यांनीच तो मिटवला होता. आदित्यही आपल्या पर्सनल लाइफची खूप काळजी घेतात. 2014 मध्ये त्यांनीही राणी मुखर्जीशी गुपचुप लग्न उरकले होते. नंतर फोटो समोर आले होते.

 

4. टीम इंडिया सहभागी व्हायला अडचण आली असती
- सध्या भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेत वनडे सिरीजमध्ये बिझी आहे. वेळापत्रक आधीच ठरलेले होते. जर यादरम्यान भारतात लग्न झाले असते, तर पूर्ण संघाच्या सहभागावर प्रश्नचिन्ह लागले असते. विराटलाही असे नको होते. आपल्या वैयक्तिक कार्यक्रमामुळे पूर्ण संघाचे वेळापत्रक आणि संघाच्या खेळावर काहीही परिणाम होऊ नये म्हणून त्याने हा निर्णय घेतला.


5. विराटचा पर्सनल लाइफला पर्सनल ठेवण्यावर विश्वास...
- विराट ग्राउंडवर भलेही आक्रमक दिसत असले, पण आपल्या पर्सनल लाइफमध्ये तो खूप काळजी करणारा आहे. त्याचा पर्सनल लाइफ पर्सनल ठेवण्यावर विश्वास आहे. एखाद-दुसरे सोडल्यास त्याने अनुष्कासोबतच्या रिलेशनवर कोणतेही वक्तव्य केले नव्हते. तो पुढे काय करणार आहे, याचा कधीही खुलासा नाही केला. विराटला माहिती आहे की, टीम इंडियाचा कॅप्टन असल्या कारणाने तो प्रसिद्ध आहे. यामुळे भारतात लग्न केल्याने त्याची लाइफ पर्सनल राहिली नसती.

 

प्रोफेशनल्ससोबत केले अॅग्रिमेंट
- लग्नाची गुप्तता कायम ठेवण्यासाठी विराट आणि अनुष्काच्या कुटुंबीयांनी पूर्ण बंदोबस्त केला होता. या फक्शनशी निगडित सर्व जण उदा. फोटोग्राफर्स, केटरर्स आणि हॉटेल स्टाफकडून नॉन डिसक्लोजर अॅग्रिमेंट साइन करून घेण्यात आले होते. यानुसार, या लग्नाशी संबंधित कोणतीही बातमी कुणीही, कुणाशीही शेअर करणार नाही, असे या अॅग्रिमेंटमध्ये होते.
- या अॅग्रिमेंटमुळे शेवटच्या क्षणापर्यंत लग्नाबाबत कोणतीही खरी माहिती किंवा तयारीशी निगडित कोणताही फोटो लीक झाला नव्हता. नंतर दोघांनी स्वत:च सोशल मीडियावर फोटो टाकून माहिती जाहीर केली.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, लग्नाचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...