आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजही अलर्ट : राजस्थान-हरियाणात धुळीचे वादळ, दिल्लीसह 6 राज्यांत पावसाचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूर्व दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी वादळामुळे वीजेचे खांब आणि झाडे कोसळली. - Divya Marathi
पूर्व दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी वादळामुळे वीजेचे खांब आणि झाडे कोसळली.

- दिल्लीमध्ये मंगळवारी दुपारपर्यंत वादळ पोहोचणार होते. पण ते वादळ सोमवारी रात्रीच पोहोचले. नोयडा, गाझियाबाद, गुडगांवमध्ये अनेक ठिकाणी वीज गुल झाली. 

- दिल्लीमध्ये आज मेट्रोचा वेग कमी असेल, वाऱ्यांचा वेग ताशी 90 किमी असला तर मेट्रो थांबवण्यात येणार आहे. 

 

नवी दिल्ली - 13 राज्यांमध्ये मंगळवारीही वादळाचा अलर्ट देण्यात आला आहे. दिल्ली, हिमाचलसह सहा राज्यांमध्ये वादळासह पावसाची आणि ईशान्येकडील सहा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये दुसऱ्या शिफ्टमधील शाळांना सुटी देण्यात आली आहे. हिमाचलच्या लाहौल स्पितीमध्ये मंगळवारी सकाळी बर्फवृष्टी झाल्याने हवामान आनंददायी झाले होते. त्यापूर्वी सोमवारी दिल्ली-एनसीआर, हरियाणामध्ये धुळीचे वादळ आणि राजस्थानच्या बिकानेरमध्ये सोमवारी जोरदार वादळ आहे. त्यामुळे रस्त्यांवरील दृश्यमानता घटली. 


8 फ्लाइट लेट
- दिल्लीमध्ये धुळीच्या वादळामुळे येणारे सात आणि जाणारे एक अशी आठ विमाने लेट झाली.  
- दिल्लीसह रोहतक, भिवानी, झज्जर, गुडगांव, बागपत, मेरठ आणि गाझियाबादमध्ये धुळीचे वादळ पाहायला मिळाले. 


या राज्यांत जोरदार पावसाचा अलर्ट 
- आसाम, मेघालय, नागालंड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा. 


या राज्यांमध्ये वादळी पावसाचा अलर्ट 
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली आणि पश्चिमी उत्तर प्रदेशच्या विविध भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह वादळ येण्याची आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानमध्ये धुळीच्या वादळाची शक्यता आहे. राजस्थानमध्ये वाळुचे वादळ येण्याचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यासाठी एंबर कलरने इशारा दिला आहे. 


हिमाचलच्या केयलाँगमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज 
हिमाचल प्रदेशच्या केयलाँगमध्येही आगामी 24 तासांत जोरदार पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. शिमलामध्ये तापमान सर्वसाधारण तापमानापेक्षा 4-5 अंशांनी घसरले आहे. सोमवारी येथे किमान तापमान 12.8 अंश नोंदवण्यात आले. 


ताशी 70 किमी वेगाने वाहिले वारे 
दिल्लीमध्ये ताशी 70 किमी वेगाने वाहिलेल्या वाऱ्यांमुळे दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी झाडे आणि वीजेचे खांब कोसळल्याची घटना घडली आहे. मयूर विहारसह काही भागांमध्ये तुरळक पाऊसही झाला. 2 मे रोजी उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह सुमारे 14 राज्यांमध्ये जोरदार वादळामुळे 125 हून अधिक लोक ठार झाले होते. तर 300 जण जखमी झाले होते. 


पाकिस्तानमधून राजस्थानात आले वादळ 
राजस्थानच्या बिकानेरमध्ये खाजुवालाला लागून असलेल्या सीमा भागात सायंकाळी सुमारे पाच वाजता अचानक वादळ सुरू झाले आणि संपूर्ण वस्तीमध्ये धूळच धूळ पाहायला मिळाली. काही वेळाने पूर्णपणे अंधार झाला. पाकिस्तानकडून आलेले हे वादळ सोमवारी सायंकाळी राजस्थानात आणि रात्री उशीरा दिल्ली-एनसीआरमध्ये पोहोचले. 


यामुळे निर्माण झाली ही परिस्थिती 
- गर्मीमुळे हवामानात हा बदल होतो. पण यावेळी पश्चिमी विक्षोभ (वेस्टर्न डिस्टर्बंस) चा परिणाम वाढला आहे. हरियाणावर हवेचा दबाव निर्माण झाला आहे. तामान्य सरासरीपेक्षा अधिक आहे. तसेच वरच्या भागातील हवेत दमटपणाही आहे. 
- दरवर्षी या काळामध्ये सर्वात आधी युरोप आणि आफ्रिकेच्या मध्ये असलेल्या भूमध्य सागरात (मेडिटेरियन सी) 25 डिग्री अंशापेक्षा अधिक तापमान झाल्यास वादळ निर्माण होते. तुर्की, इराक, ईराणद्वारे ते जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचते. येथे डोंगरांनाल धडकल्यानंतर ते दिल्लीकडे वळते. त्यानंतर ते मार्गातील प्रत्येक राज्यावर परिणाम करते. 

 

एंबर कलर इशारा म्हणजे काय.. 

इशाऱ्याचे 4 ग्रेड वेग वेगळ्या करल कोड मार्फत दर्शवले जातात. 

1. ग्रेड ग्रीन : या इशाऱ्यामध्ये काहीही अॅक्शन घेण्याची गरज नसते. 
2. ग्रेड यलो : स्थितीवर नजर ठेवावी लागते. 
3. ग्रेड एंबर : सरकारी एजन्सींना कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज केले जाते. 
4. ग्रेड रेड : एजन्सींना कारवाई करावी लागले. 


पुढे वाचा, हवामानात वेगाने होणाऱ्या बदलांबाबत तज्ज्ञांनी नोंदवलेले मत... 


 

बातम्या आणखी आहेत...