आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2012 ते 2018 पर्यंतचे CBSE 12वीचे टॉपर्स, जाणून घ्या कुठे करताहेत करिअर?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- गेल्या 7 वर्षांच्या टॉपर्सपैकी 6 टॉपर्स दिल्ली-एनसीआरमधील आहेत. त्यात 3 मुले आणि 4 मुली आहेत. 

- सीबीएसई आर्ट्स-कॉमर्समधील टॉपर्सची पसंती डीयू तर सायन्स-मॅथ्सच्या स्टुडंट्सची पसंती आयआयटीला आहे. 


सर्वात आधी जाणून घेऊयात 2012 ते 2018 मध्ये कसा होता निकाल.. 

 

वर्ष सरासरी टक्केवारी

उत्तीर्ण झालेले विद्यार्थी %

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी % टॉपर टॉपरची टक्केवारी 
2012 80.19% 75.8% 86.21% मणिपूर - मोहम्मद इस्मत 99%
2013 82.1% 77.78% 87.98% दिल्ली - पारस शर्मा 99%
2014 82.66% 78.27% 88.52% गुडगांव - सार्थक अग्रवाल 99.6%
2015 82% 77.77% 87.55% दिल्ली- एम गायत्री 99.2%
2016 83.05% 78.85% 88.58% दिल्ली -  सुकृती गुप्ता 99.4%
2017 82.02% 78% 87.50% नोएडा - रक्षा गोपाल 99.6%
2018 83.01% 78.99% 88.31% नोएडा - मेघना श्रीवास्तव 99.9%

 

करिअर आणि यशाची गाथा विद्यार्थ्यांच्या तोंडून 
मोहम्मद इस्मत
माझ्या वडिलांनी मला चांगले शिक्षण मिळावे यासाठी खूप कष्ट घेतले. ते प्राथमिक शिक्षक आहेत. महिन्याला फक्त 2 हजार रुपये कमावतात. पैसे नसल्याने सहावीपर्यंत मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलो आणि त्यानंतर केंद्रीय विद्यालयात गेलो. त्यानंतर जेनिथ अॅकेडमीच्या डायरेक्टरने मला कमीत-कमी फीसमध्ये शिकवले. युपीएससी पास होऊन भारतातून पहिला क्रमांक मिळवण्याचे माझे स्वप्न आहे. 


पारस शर्मा 
12 वीमध्ये पहिले येण्याचे माझे स्वप्न होते, त्यासाठी मी प्रचंड मेहनत केली. अनेक विषयांसाठी मी शिकवणीही घेतली. नियमित अभ्यासावर मला विश्वास आहे. त्यामुळे मी रोज 4 तास अभ्यास करायचो. तर सुट्यांमध्ये 6-7 तास अभ्यास करायचो. डान्स आणि योगा हे माझे छंद आहेत. जगभरातून गरीबी आणि निरक्षरता हद्दपार करण्याचे माझे स्वप्न आहे. त्यासाठी मला अर्थशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. 


सार्थक अग्रवाल
अशा प्रकारचे यश मिळवण्यासाठी कायम पुस्तकातच डोके असायला हवे असे नाही. तर त्यासाठी टाइम मॅनेजमेंट गरजेचे आहे. तुम्ही कमी अभ्यास केला तरी जेवढा अभ्यास कराल तेवढा मन लावून करायला हवा. तसे केल्यास कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही. अभ्यासासाठी मी फेसबूकसारख्या सोशल साईट्सपासूनही दूर राहिलो. अर्थशास्त्रात ग्रॅज्युएशननंतर मी एमबीए करणार असून नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणार आहे. 

 

एम गायत्री
माझ्या आईवडिलांनी कधीही माझ्यावर दबाव आणला नाही. मी रोज 5-6 तास अभ्यास करायचे. सोबतच सिंगिगं क्लासही सुरू होता. अर्थशास्त्रात 100 पैकी 100 गुण मिळवणे हा माझा उद्देश होता. पण तसे होऊ शकले नाही. मला सीए बनायचे आहे त्यासाठी अभ्यास करणार आहे. 


सुकृती गुप्ता 
मी टॉप करेल असे वाटले नव्हते आणि त्यासाठी मी प्लानिंगही केले नव्हते. एक चांगली इंजिनीअर बनण्याचे माझे स्वप्न होते. त्यासाठी मी तयारी करत आलेली आहे. माझ्यावर कोणीही कधीही दबावही आणला नाही. काही टेन्शन आलेच तर माझे आई वडील मला समजावतही होते. 


रक्षा गोपाल
एखाद्या गोष्टीसाठी झोकून दिले तर त्यात यश नक्कीच मिळते. मी 12वीसाठी कोचिंग लावले नव्हते. तर सेल्फ स्टडी करून हे यश मिळवले. त्यासाठी मी सकाळी लवकर उठायचे आणि अभ्यास करायचे. रोज मी 7-8 तास अभ्यास करायचे. त्यानंतर मला राज्यशास्त्रात बीए करायचे आहे. ग्रॅज्युएशननंतर मी युपीएससीवर लक्ष केंद्रीत करेल. 


मेघना श्रीवास्तव
परीक्षेत यशस्वी होण्यासाठी वर्षभर कठोर परीश्रम घ्यावे लागतात. कोणत्याही प्रकारच्या डिस्ट्रॅक्शनपासून दूर राहायला हवे. त्यासाठी मी सोशल मीडियापासूनही लांब राहिले नाही पण लक्ष केंद्रीत राहावे म्हणून मी अभ्यास आणि त्यासाठीचा वेळ मॅनेज केला. मला मानसशास्त्रात करिअर घडवायचे आहे. त्यासाठी फॉरेन युनिव्हर्सिटत अप्लाय करणार आहे.  


जाणून घ्या.. सध्या काय करत आहेत. 2012 ते 2018 चे CBSE चे टॉपर्स 

 

 

वर्ष टॉपरचे नाव शाळा आई-वडील आणि व्यवसाय काय करत आहेत टॉपर्स?
2012 मोहम्मद इस्मत जेनिथ अॅकेडमी, इंफाळ, मणिपूर मोहम्मद बशीर-उल रहमान - प्राथमिक शिक्षक  दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन 
2013 पारस शर्मा  लँसर कॉन्व्हेंट स्कूल, रोहिणी, दिल्ली राजीव शर्मा आणि डॉ. माला शर्मा - ट्रॅव्हल कंपनीचे संचालक  श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून इकॉनॉमिक्स ऑनर्सचे शिक्षण सुरू 
2014 सार्थक अग्रवाल दिल्ली पब्लिक स्कूल, वसंत कुंज, दिल्ली सुशील चंद्रा आणि नीरा चंद्रा - सॉफ्टवेअर कन्सल्टंट श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स मधून इकोनॉमिक्स ऑनर्सचे शिक्षण सुरू 
2015 एम गायत्री न्यू ग्रीन फील्ड स्कूल, साकेत, दिल्ली एस मोहन आणि लक्ष्मी मोहन - मिनिस्ट्री ऑफ रूरल डेवलपमेंट में कर्मचारी सीएचे शिक्षण सुरू
2016 सकृती गुप्ता मोंटफोर्ट स्कूल, अशोक विहार, दिल्ली राकेश गुप्ता आणि रेणुका जैन गुप्ता - इंजीनियर आयआयटी दिल्लीमधून बीटेकचे शिक्षण सुरू
2017 रक्षा गोपाल एमिटी इंटरनॅशनल स्कूल, नोएडा गोपाल पी श्रीनिवासन आणी रजनी गोपाल - गुजरात पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये चीफ फायनान्स ऑफिसर दिल्ली यनिव्हर्सिटीतून  राज्यशास्त्रात बीए सुरू 
2018 मेघना श्रीवास्तव स्टेप बाय स्टेप, नोएडा गौतम श्रीवास्तव आणि अल्पना श्रीवास्तव - वडील फरीदाबादमध्ये प्रोफेसर आणि आई एचआर कन्सल्टंट  यूनिव्हर्सिटी ऑफ कोलंबियामधून मानसशास्त्राचे शिक्षण घेण्याची इच्छा. 

 

टॉपर्सची पहिली पसंती दिल्ली युनिव्हर्सिटीच का.. 
- सीबीएसई, आयसीएसई किंवा स्टेट बोर्ड सर्व टॉपर्सची पहिली पसंती कायम दिल्ली युनिव्हर्सिटीहीच राहिली आहे. सीबीएसईचे बहुतांश टॉपर्स दिल्ली युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेऊ इच्छित असतात. 
- सीबीएसई आर्ट्स आणि कॉमर्सचे टॉपर्स डीयूमधूनच पुढील शिक्षण घेणे पसंत करतात. तर सायन्स टॉपर्सची पसंती कायम आयआयटीला राहिलेली आहे. 
- यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे, जॉब प्लेसमेंट. 12वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी जेव्हा भविष्यावर लक्ष केंद्रीत करतात आणि त्यासाठी ते जॉब प्लेसमेंट आणि चांगले सॅलरी पॅकेजची गँरंटी असेल असेच कॉलेज निवडतात. 
- याबाबतील दिल्ली युनिव्हर्सिटी आघाडीवर आहे. तसेच याठिकाणी असलेली फॅकल्टी आणि वातावरही लोकांना प्रचंड आवडते. 
- बहुतांश टॉपर्सच्या मते इतर युनिव्हर्सिटीमध्ये परीक्षा, सेशन यांच्या वेळा ठरलेल्या नसतात. डीयूमध्ये मात्र हे सर्व पद्धतशीरपण होते. 


 

 

बातम्या आणखी आहेत...