आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्होटर फिक्सिंगचे वादग्रस्त फेसबुक; फेसबुकच्या डेटावरून भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सुमारे ५ कोटी फेसबुक युजर्सचा डेटा चोरून अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दुरुपयोग केल्याचे स्पष्ट झाल्यावर अमेरिकी राजकारणात उठलेले वादळ आता भारतात पोहोचले आहे. कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी आरोप केला की, ‘२०१९ची निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस डेटा चोरीची आरोपी असलेल्या केम्ब्रिज अॅनालिटिकाची सेवा घेत आहे. भारतात २० कोटी फेसबुक युजर्स असून निवडणुकीत हस्तक्षेप सहन करणार नाही. वेळप्रसंगी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्गना पाचारण करू.’ प्रत्युत्तरादाखल काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला म्हणाले, ‘भाजप फेक न्यूज फॅक्टरी चालवत आहे. २०१४ मध्ये भाजपनेच या संस्थेची सेवा घेतली होती.’ अमेरिका व ब्रिटिश माध्यमांचा दावा आहे की अॅनालिटिकाने ५ कोटी युजर्सचा डेटा चोरून ट्रम्प यांना मदत केली होती. 

 

व्हॉट्सअॅपचे संस्थापक म्हणाले, फेसबुक डिलीट करण्याची वेळ आता आलीय...
केम्ब्रिज अॅनालिटिका डेटा घोटाळ्यादरम्यान व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी ट्विट केले की, आता फेसबुक डिलीट करण्याची वेळ आली आहे. फेसबुकने झेन कॉम आणि ब्रायन अॅक्टनकडून २०१४ मध्ये व्हॉट्सअॅप खरेदी केले होते. 
- दोन दिवसांपासून ‘डिलीट फेसबुक कॅम्पेन’चा ट्रेंड सुरू...


सोशल मीडिया आणि निवडणुकांबाबत काय म्हणाले प्रसाद.. 
1) गरज पडली तर फेसबूकवरही कारवाई 

- प्रसाद म्हणाले, गरज पडली तर फेसबूक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही कठोर कारवाई केली जाईल. सरकार माध्यमांच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करते. तसेच सोशल मीडियावर विचारांचे आदान प्रदान करण्यासही पाठिंबा आहे, असेही प्रसाद म्हणाले. 


2) आम्ही काँग्रेसला विचारले, किती डाटा शेअर केला 
- प्रसाद म्हणाले, आम्ही काँग्रेसला विचारले आहे, कॅम्ब्रिज अॅनालिटिकाच्या सीईओबरोबर भारतीयांची किती माहिती शेअर केली आहे. या कंपनीच्या विरोधात अमेरिका आणि ब्रिटनमध्ये गंभीर आरोप आहेत. कंपनीने नायजेरिया, केनिया, ब्राझील आणि भारतातही निवडणुकांवर परिणाम घडवून आणल्याचा दावा केला आहे. 


3) काँग्रेसला निवडणुका जिंकण्यासाठी डाटा चोरी करण्याची गरज?
- आयटी मिनिस्टर म्हणाले, काँग्रेसला निवडणुका जिंकण्यासाठी डाटा चोरी करण्याची गरज आहे काय? राहुल गांधींच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये कॅम्ब्रिज अॅनालिटिकाची भूमिका काय आहे? 


4) हस्तक्षेप मान्य होणार नाही.. 
आम्ही सोशल मीडियावर विचारांची देवाण-घेवाण करण्याचे समर्थन करतो. पण सोशल मीडिया आणि फेसबूकद्वारे वाईट हेतून भारताच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप होत असेल तर ते सहन केले जाणार नाही. फेसबूकने हे लक्षात ठेवावे. 


5) निःपक्ष निवडणुका व्हाव्यात 
प्रसाद म्हणाले-अशा बातम्या येत आहेत की, गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर बनावट पद्धतीने राहुल गांधींचे फॉलोअर्स वाढवले आहेत. हा फक्त काँग्रेसचा प्रश्न नाही, तर निःपक्ष पद्धतीने निवडणुका व्हाव्या आणि देशाच्या लोकशाही मुल्यांदा हा प्रश्न आहे. आम्हाला सोशल मीडियावर लगान लावायचा नाही. कारण यामुळे नागरिकांना थेट प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळाला आहे. पण सोशल मीडियाचा गैरवापर आणि तोही विदेशी कंपन्यांकडून मान्य होणार नाही. 

 

निवडणुकांत हस्तक्षेपाचा आरोप 
- न्यूयॉर्क टाइम्स आणि लंडन ऑब्झर्व्हरने गेल्या आठवड्यात त्यांच्या रिपोर्टमध्ये कॅम्ब्रिज अॅनालिटिकाबाबात खुलासे केले. 
- एक टीव्ही चॅनलने  अॅनालिटिकाच्या सीईओंबाबत रिपोर्ट दाखवला. त्यात निक्स कॅमेऱ्यासमोर हे म्हणताना दिसला की, त्याने नेत्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी आणि निवडणुकांवर परिणाम व्हावा यासाठी सुंदर महिलांचा वापर केला आणि लाचही दिली. फेसबूकशी संबंधित डेटा चोरीच्या या बातमीनंतर 48 तासांतच मार्क झुकेरबर्गला सुमारे 58,500 कोटींचे नुकसान झाले. 

 

बातम्या आणखी आहेत...