आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमान खाली आले तेव्हा केला कैलास मानसरोवराला जाण्याचा संकल्प : राहुल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एक आठवड्याआधी घटना बचाव मोहीम, आता जनआक्रोश रॅली; काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सतत मोदी सरकारवर हल्ले करत आहेत. रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानात सभेला संबोधित करताना राहुल यांनी कर्नाटक दौऱ्यात आपल्या विमानाच्या तांत्रिक नादुरुस्तीचा उल्लेख केला. राहुल भाषण आटोपून बसले होते, पण थोड्या वेळाने पुन्हा उठले आणि माइक हाती घेतला.

 

त्यामुळे सर्वच चकित झाले. राहुल म्हणाले की, तुम्ही काँग्रेस कार्यकर्ता आहात. मला तुम्हाला काही सांगायचे आहे. २-३ दिवसांपूर्वी आम्ही कर्नाटकला जात होतो, विमानात होतो. अचानक विमान ८ हजार फूट खाली आले. मला वाटले संपले. तेव्हाच कैलास मानसरोवर यात्रा करण्याचे ठरवले.मी कर्नाटक निवडणुकीनंतर १०-१५ दिवस कैलास मानसरोवरला जाईन. सभेला सोनिया गांधी आणि मनमोहनसिंगही उपस्थित होते.

 

देशाची जनता पंतप्रधानांच्या भाषणात सत्य शोधत असते

राहुल म्हणाले की, मी भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहे, असे मोदीजी म्हणतात. कर्नाटकमध्ये ते बोलत होते तेव्हा त्यांच्या बाजूला येदीयुरप्पा होते. येदीयुरप्पा भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात जाऊन आले आहेत. मोदींच्या ‘न खाऊंगा और न खाने दूंगा’ आश्वासनाचे काय झाले? देश पंतप्रधानांचे भाषण एेकतो आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो. सुप्रीम कोर्टाचे जज पहिल्यांदाच जनतसमोर आले. साधारणत: जनता सुप्रीम कोर्टात जाते. ते न्यायमूर्ती म्हणाले की, आम्ही जनतेकडून न्याय मागत आहोत. मोदींनी चार वर्षांत काय केले ते मी सांगतो. त्यांनी बेरोजगारी दिली, गब्बरसिंग टॅक्स दिला, त्यांच्या आमदारांनी महिलांची छेड काढली.

 

आव्हान : ते काँग्रेसबद्दल खोटे पसरवतात, सर्व निवडणुका जिंकू

राहुल म्हणाले, आमच्या सरकारबद्दल मोदींनी खोटे पसरवले. प्रत्येक ठिकाणी काँग्रेसवर टीका केली. आता त्यांचे सत्य समोर येत आहे. गुजरातच्या माध्यमांनी म्हटले की, काँग्रेसला २५ पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. तेथे ते थोडक्यात बचावले. शिंदे, पायलट, कमलनाथ, गेहलोतजी, निवडणुकीत काय होणार ते पाहा. आम्ही मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान जिंकू.

 

संस्कृती : भाजपत फक्त मोदी, शहांना प्रतिष्ठा, काँग्रेसमध्ये सर्वांना

राहुल म्हणाले की, मी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. या पक्षात ज्येष्ठ असो की युवा, तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल. कोणी तुमचा आदर केला नाही तर मी त्याच्यावर कारवाई करेन. सलमान खुर्शीद येथे बसलेले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक वक्तव्य केले होते. मी खुर्शीद यांचे रक्षण करेन. भाजपत फक्त मोदी, शहांचे चालते. तेथे जेटली, अडवाणी किंवा इतर कोणालाही प्रतिष्ठा नाही.

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...