आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​लोकपाल नियुक्ती कधी करणार, दहा दिवसांत सांगा : काेर्टचे सरकारला अादेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लोकपाल नियुक्तीत होणाऱ्या विलंबाबद्दल सोमवारी सुप्रीम कोर्टाने कठोर पवित्रा घेतला. १० दिवसांत शपथपत्र दाखल करून लोकपालच्या नियुक्तीची मुदत सांगा, स्थितिदर्शक अहवालात लोकपाल नियुक्तीत पुढे काय पावले उचलणार याचीही सविस्तर माहिती सादर करण्याचे अादेश न्या. रंजन गोगोई व आर.भानुमती यांच्या पीठाने सरकारला दिले. सुनावणीदरम्यान अॅटॉर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी लोकपाल नियुक्तीच्या मुद्द्यावर सरकारचे लेखी निर्देशही कोर्टासमक्ष सादर केले.

बातम्या आणखी आहेत...