आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 35 चे पेट्रोल 83 रुपयांना, मनमोहन यांनी जे केले ते मोदी का नाही करू शकत? Why Indias Fuel Prices Are Sky High When Oil Is Not

35 चे पेट्रोल 83 रुपयांना, मनमोहन यांनी जे केले ते मोदी का नाही करू शकत?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - सध्या देशभरात डीझेल-पेट्रोलच्या दरांमध्ये मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. देशातील बहुतांश भागांत पेट्रोल 75 ते 83 रुपयांदरम्यान विक्री होत आहे. तर डिझेलच्या किमती 65-68 रुपयांच्या आसपास आहेत. पेट्रोलच्या किमतीमधील वाढ देशाने याआधीही पाहिलेली आहे, परंतु स्वतंत्र भारताच्या इतिहासात डिझेल एवढे महाग कधीही नव्हते.

> हे सर्व सुरू असताना आंतराष्‍ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती आताही 2014च्या पातळीवर नाहीत.  एकदा तर एक बॅरलची किंमत 115 डॉलरच्या पार गेली होती. त्या उंचीवरही रिटेलमध्ये पेट्रोलच्या किमती 75 ते  80 रुपये प्रति लिटरच्या आसपास होत्या. ब्‍लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, सध्या काळात क्रूडच्या किमती जेथे आहेत, त्या पातळीवर जगातील कोणत्याही देशातील ग्राहकाला तेवढी झळ बसत नाहीये, जेवढी भारतात.

> मग महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की, जेव्हा 100 डॉलरच्या वर किंमत जाऊनही 2014 मध्ये तेव्हाच्या मनमोहन सरकारने ग्राहकांना किमतीची झळ बसू दिली नव्हती, आणि आता 2018 मध्ये मोदी सरकार असताना मात्र 72 डॉलर प्रति बॅरल दर असूनही ग्राहकांना घाम फोडला आहे.

>115 डॉलर किंमत होऊनही जे मनमोहन यांनी केले, ते मोदी 72 डॉलर प्रति बॅरलच्या पातळीवरही का करू शकत नाहीयेत? महत्त्वाचे म्हणजे येणाऱ्या काळात अनेक राज्यांत विधानसभा निवडणुका आहे, 2019 मध्ये लोकसभा निवडणूक आहे.

सोर्स: ब्‍लूमबर्ग      

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, पेट्रोल-डिझेलच्या किमती सरकार का कमी करू शकत नाही? 

बातम्या आणखी आहेत...