आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Will Tas's Tradition Break Into Cricket ?; Discussion In A Meeting In May In Mumbai

क्रिकेटमध्ये ‘टाॅस’ची परंपरा खंडित होणार?; मुंबईत मे महिन्यात होणाऱ्या बैठकीत चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - क्रिकेटचा सामना सुरू व्हायचा म्हटले की पंच आणि दोन्ही संघांचे कर्णधार अगाेदर मैदानावर येणार. पंच नाणेफेक करणार आणि नंतर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाच्या कर्णधाराने फलंदाजी घ्यायची की गोलंदाजी, हे ठरवायचे ही परंपरा सुरू आहे. मात्र, आगामी काळात नाणेफेक करण्याची ही पद्धत बंद होऊ शकते. यावर विचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीची २८-२९ मे रोजी मुंबईत बैठक होत आहे.


नाणेफेक कुणी जिंकली यावर अनेक मैदानांवर संबंधित सामन्याचा निकाल अवलंबून असायचा. विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये हा परिणाम अधिक जाणवत होता. मात्र, आगामी काळात ही नाणेफेक करण्याची पद्धत रद्द होऊन पाहुण्या संघाच्या कर्णधाराला फलंदाजी किंवा गोलंदाजी निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीची बैठक २८-२९ मे रोजी मुंबईत होत आहे. या बैठकीत क्रिकेटधील या सर्वात जुन्या परंपरेत बदल करण्याबाबत विचार होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...