आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 दिवसांच्या मुलीला घेऊन वीर जवानाच्या अंत्यसंस्कारात गेली आई, फोटो होतोय व्हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ आसाम - सोशल मीडियावर महिला आर्मी ऑफिसर कुमुद डोगरा आणि त्यांच्या 5 दिवसांच्या मुलीचा इमोशनल फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत कुमुद युनिफॉर्ममध्ये आहे. त्यांच्या कडेवर फक्त 5 दिवसांची मुलगी आहे. वास्तविक हा फोटो एखाद्या इव्हेंटचा नसून कुमुद आपल्या पतीच्या अंत्यसंस्काराला पोहोचल्याचा आहे. काही दिवसांपूर्वी आसामच्या माजुली येथे भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. यात त्यांचे पती दुष्यंत वत्स यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

 

दोन पायलट्सचा झाला होता मृत्यू...
- 15 फेब्रवारी रोजी आसामच्या माजुली आइसलँडमध्ये भारतीय सैन्यदलाचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. या हेलिकॉप्टरमध्ये स्वार दोन्ही पायलट्सचा मृत्यू झाला होता. यात विंग कमांडर जयपाल जेम्स आणि विंग कमांडर दुष्यंत वत्स यांचा समावेश आहे. यातील दुष्यंत वत्स हे मेजर कुमुद डोगरा यांचे पती होते.
- सूत्रांनुसार, हेलीकॉप्टरने आसामच्या जोरहट्टमधून उड्डाण केले होते. ते सामान घेऊन अरुणाचल प्रदेशाकडे जात होते. त्याआधीच माजुली आइसलँडमध्ये हा दुर्दैवी अपघात झाला.
- अंत्यसंस्काराचा हा फोटो फेसबुकच्या एका पेजवर शेअर करण्यात आला आहे. यानंतर इमोशनल करणारा हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे. यूजर्स या फोटोला आपल्या वॉलवर शेअर करत आहेत. सोबतच अनेक तऱ्हेच्या कॉमेंट्स आणि इमोशनल करणाऱ्या पोस्ट्स लिहिल्या जात आहेत.

 

युजर्स करताहेत कॉमेंट्स...
- एक युजर्सने कॉमेंट केली आहे की, हे खूप दु:खदायक आहे. मेजर कुमुद डोगरा यांनी आपल्या 5 दिवसांच्या मुलीला कडेवर घेतले आहे. आणि त्या आपले पती विंग कमांडर डी. वत्स यांच्या मृतदेहाकडे मार्च करत जात आहेत.
- दुसरीकडे आणखी एका युजरने लिहिले आहे की, मेजर कुमुद यांच्या या धीरोदात्तपणाला सलाम.
- आणखी एका युजरने लिहिले आहे की, हा खूप इमोशनल फोटो आहे. या फोटोला अब्जावधी सलाम. एक भारतीय म्हणून मी सलाम करू इच्छितो. जय हिंद.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...