आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे घेऊन येत आहे नवे फिचर्स, डब्याचा रंग गुलाबी ठेवण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  रेल्वे महिलांसाठी अनेक नव्या सुविधा घेऊन येत आहे. यामुळे महिलांचा प्रवास सुखकर तर होणारच आहे, त्याच बरोबर सुरक्षित होईल याकडेही रेल्वेने लक्ष दिले आहे. रेल्वे प्रत्येक कोचमध्ये 'पॅनिक बटन' देत आहे.

 

का लावले जात आहे पॅनिक बटन

रेल्वे महिलांसाठी नित्यनव्या सुविधा देत असते. रेल्वेमध्ये महिलांसोबत होणारे गैरवर्तन आणि छेडछाड यातून त्यांची तत्काळ सुटका व्हावी यासाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या प्रत्येक डब्यात एक 'पॅनिक बटन' लावण्याची तयारी केली आहे. संकटकाळी महिलांनी हे पॅनिक बटन दाबले तर त्यांच्यापर्यंत तत्काळ मदत पोहोचवली जाईल. रेल्वेच्या उत्तर-पूर्व विभागाचे जनसंपर्क अधिकारी संजय यादव यांनी सांगितले, की महिलांसोबत रेल्वेमध्ये अनुचित प्रकार घडण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पॅनिक बटन लावण्याची तयारी सुरु आहे. 

 

महिला कोचची जागा बदलणार 

- रेल्वे कोचमध्ये लावल्या जाणाऱ्या पॅनिक बटनची लिंक गार्डच्या कोचसोबत असेल. डब्यातील इलेक्ट्रिक स्विचच्या वरती हे पॅनिक बटन लावले जाईल, जेणे करुन महिला सहजतेने त्याचा वापर करु शकतील. 
- महिला कोच हा सर्वसाधारणपणे प्रत्येक रेल्वेच्या शेवटी असतो. त्याऐवजी हा डबा महिला सुरक्षेच्या दृष्टीने मध्यभागी लावला जाण्याची तयारी सुरु आहे. महिला सुरक्षेसाठी उपाय योजना करणाऱ्या एका समितीनेही या सुधारणांना मंजूरी दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 
- या कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचीही तयारी सुरु आहे, त्यासोबतच सुरक्षेचे इतर उपाय देखील केले जाणार आहेत. 

 

गुलाबी रंगाचा असेल महिला डबा
- महिला कोचला गुलाबी रंग देण्याची रेल्वेची तयारी सुरु आहे. यावर अद्याप अंतिम निर्णय झाला नाही, मात्र महिलांशी संबंधित रंग डब्याला देण्याचा रेल्वे विचार करत आहे. 
- रेल्वे हे बदल निम्नशहरी आणि लांब पल्ल्यांच्या रेल्वेमध्ये करणार आहे. 
- भारतीय रेल्वे 2018 हे वर्ष महिला सुरक्षेसाठी समर्पित करण्याच्या तयारीत आहे. या अभियानांतर्गत ही पाऊले उचलली जात आहेत. 

बातम्या आणखी आहेत...