आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीयांपेक्षा पाकिस्तानी लोक जास्त आनंदी, जागतिक हॅप्पीनेस रिपोर्टमध्ये फिनलंड सर्वात खूश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिनलंड हा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. - Divya Marathi
फिनलंड हा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे.

नवी दिल्ली - जगातील आनंदी लोकांच्या यादीत भारतातील नागरिक फार मागे पडले असल्याचा एक अहवाल आला आहे. फिनलंड हा जगातील सर्वात आनंदी देश असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारताचे स्थान 156 देशात 133 व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारत 11 पायऱ्या खाली आला आहे. विशेष म्हणजे आपला शेजारी देश पाकिस्तान,  भारतासह चीन, बांगलादेश, श्रीलंका आणि म्यानमार यांना मागे टाकत आनंदी देशांच्या यादीत 75व्या क्रमांकावर आहे. श्रीलंका 4 पायऱ्या वर चढत 116व्या क्रमांकावर पोहोचला आहे. बुधवारी रात्री यूनायटेड नेशन्सने (यूएन) वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. 

 

अमेरिका ब्रिटनचा आनंद घटला 
- संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार अमेरिका आणि ब्रिटन या देशांमधील आनंदही घटला आहे. अमेरिका 18व्या तर ब्रिटन 19व्या क्रमांकावर आहे. 
- जगभरातील 156 देशांचा यूएनने 6 पातळ्यांवर अभ्यास केला. यात उत्पन्न (जीडीपी), आरोग्य, सामाजिक सहकार्य, स्वातंत्र्य, विश्वास, आणि एकमेकांबद्दलची उदारता, दानत यांचा समावेश होता. 
- त्यासोबतच यामध्ये शरणार्थी आणि अप्रवासी यांच्यासाठीच्या जीवनमानाचाही नव्याने समावेश करण्यात आला होता. 
- सर्वांमध्ये फिनलंड सर्वात अव्वल ठरले आहे. 

 

टॉप रँकमधील 5 देश 
#1- फिनलंड 
#2- नॉर्वे 
#3- डेन्मार्क 
#4- आइसलँड 
#5- स्वित्झर्लंड 

 

आपण आणि आपल्या शेजारी देशांची स्थिती 

 

देश क्रमांक
पाकिस्तान 75
चीन 85
भूतान 97
नेपाळ 101
बांगलादेश 115
श्रीलंका 116
म्यानमार 130
भारत 133
बातम्या आणखी आहेत...