आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका दिवसात 320 कोटींचे मालक बनले Xiaomi India चे एमडी, वाचा कसा झाला चमत्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हाँगकाँग शेअर बाजारात चिनी कंपनी शाओमी शेअर लिस्टेड होताच भारतातील एक व्यक्ती एका दिवसात 320 कोटींचा मालक बनला. हा व्यक्ती म्हणजे शाओमी इंडिया (Xiaomi India) चे एमडी मनु जैन. कंपनीने त्यांना नुकतेच 2.29 कोटींचे शेअर दिले होते. दोन दिवसांपूर्वीच कपनीने शेअर बाजारात लिस्टेड होताच आपला IPO जारी केला. त्यामुले मनु यांच्या शेअर्सची किंमत एवढी वाढली आहे. 

 

कोण आहे मनु जैन? 
मनु जैन मूळचे उत्तर प्रदेशच्या मेरठमधील एक सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य आहेत. त्यांनी 2003 मध्ये आयआयटी दिल्‍लीमधून मॅकेनिकल इंजिनीअरींगमध्ये बी-टेक केले होते. साल 2006 में मध्ये त्यांनी करिअरची सुरुवात मॅकेंजीमधून केले होती. 2007 मध्ये IIM कोलकाता मधून मॅनेजमेंटची डीग्री घेतल्यानंतर ते फॅशन ई-कॉमर्स साइट जबॉन्गचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. 


2014 मध्ये शाओमीमध्ये प्रवेश 
जून 2014 मध्ये शाओमीने भारतीय मार्केटमध्ये एंट्री केली. त्याचवेळी कंपनीने मनु जैन यांना कंट्री हेड बनवले. मनु जैन यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे कंपनी चार वर्षात एवढी प्रसिद्ध झाली. मिडल रेंज स्मार्टफोन मार्केटमध्ये आज ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...