आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगी आदित्यनाथ यांच्या गोशाळेतील 400 गायींची देखभाल करतो हा मुस्लिम युवक!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरखपूर- उत्तर प्रदेशचे (यूपी) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला सोमवारी एक वर्षे पूर्ण झाले. 19 मार्च 2017 रोजी योगी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, वर्ष पूर्ण होण्याच्या आतच योगी आदित्यनाथ आपल्या लोकसभा मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. 29 वर्षानंतर भाजपने गोरखपूरची जागा गमावली आहे. त्यामुळे योगी सरकारच्या वर्षपूर्ती म्हणावी तशी झाली नाही. त्यातच एका कॅबिनेट मंत्र्यांनेही जनता त्रस्त असताना कसले सेलिब्रेशन करता असे म्हणत सेलिब्रेशनची हवा काढून घेतली. पण आज आम्ही तुम्हाला योगी यांच्या राजकारणाबाबत नाही तर एक वेगळी माहिती देणार आहोत. ते म्हणजे योगींच्या गोमाता प्रेमाविषयी....

 

- योगी आदित्यनाथ यांच्या गौशाळा सेवा केंद्रात 400 गायी आहेत. कट्टर हिंदुत्त्ववादी नेता अशी प्रतिमा असलेले योगी आदित्यनाथ यांच्या गोशाळेतील गायींची देखरेख मात्र एक मुस्लिम तरुण करत आहे. 
- हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण हे सत्य आहे. मान मोहम्मद असे या तरुणाचे नाव आहे.
- गोरखपूर येथील गोरक्षनाथ मंदिराच्या मागे गोशाळा सेवा केंद्र आहे. तेथे हरियाणा, साहिवाल आणि गुजरातमधील गीर जातीच्या शेकडो गाय आहेत. गायींसह काही बैलही आहेत.
- आधी खासदार नंतर महंत आणि आता यूपीचे मुख्यमंत्री बनलेले आदित्यनाथ गोरखपूरमध्ये येतात तेव्हा गायींना स्वत: हाताने सकाळ-संध्याकाळ गुळ, बिस्किट आणि चारा खाऊ घालतात. 
- गोशाळेचे व्यवस्थापक शिव यादव यांच्या नेतृत्त्वाखाली मान मोहम्मद, त्याचे वडील इनयतुल्लाह, विजय, पिंटू, सीताराम आणि सुरेंद्र या गायींची देखरेख करतात.

 

50 गावी दुभत्या...

 

- सुरेंद्र राय यांच्या माहितीनुसार, गोशाळेत जवळपास 50 गायी दुभत्या आहेत. प्रतिदिन त्या 50 ते 60 लिटर दूध देतात.
- विशेष म्हणजे गोशाळेतील दूध बाहेर विक्री केले जात नाही. दूधापासून दही, तूप आणि मठ्ठा तयार केला जातो. मठ्ठा योगी भवनमध्ये येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला देण्यात येतो.
- तसेच दूधापासून तयार झालेल्या खव्याचे पेढे आणि लाडू प्रसाद म्हणून वाटप करण्यात येतात. उर्वरित दूध येथे वास्तव्य करणार्‍या साधु-महंतांना दिले जाते.
- गायींच्या शेणापासून जैविक खत तयार केले जाते. महिन्याकाठी 500 ते 1000 पोते खत निघते. याचा वापर गोरखनाथ मंदिर परिसरातील फूल झाडे आणि फळझाडांना करण्यात येतो.

 

मान मोहम्मदने लहानपणीच स्वीकारले गोसेवेचे व्रत...

 

- महाराजगंज चौकात राहाणारा मान मोहम्मद याने लहानपणापासून गोसेवेचे व्रत स्वीकारल्याचे आहे.
- मंदिर परिसरातील एका खोलीत तो राहातो. इनायतुल्लाह यांचे वय झाल्याने ते सध्या गावी राहतात.

 

गायींशिवाय चैन पडत नाही- 

 

- मान मोहम्मदचे म्हणणे आहे की, गायींशिवाय त्याला चैन पडत नाही. येथे कोणीही गाय दान करू शकतो. तसेच गोसेवा करण्यासाठी राहू शकतो. 
- ‍कायद्याचे शिक्षण घेणारा पन्नालाल शर्मा हा विद्यार्थी दररोज गोशाळेत येतो. गायींची सेवा करतो. कार्तिक, प्रदीप कुमार मौर्य यांनी देखील गायींची सेवा करण्‍यात संपूर्ण दिवस घालवतात. गाय ही आमची माता आहे. तिची सेवा करण्यात आनंद मिळत असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.

 

पुढे स्लाईडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटोज...

बातम्या आणखी आहेत...