आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणवदा म्हणाले- हेडगेवार भारतमातेचे थोर सुपूत्र; काय आहे RSS, जाणून घ्या 10 FACTS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज नागपुरमध्ये आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी ते रेशीमबागेत उपस्थित राहून स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याआधी सरसंघचालकांसोबत ते संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या निवासस्थानी गेले. त्यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. येथील नोंदवहित त्यांनी लिहिले, 'भारतमातेच्या थोर सुपूत्राला वंदन करण्यासाठी आलो आहे.'

 

संघस्थानी मुखर्जी जाण्यावरुन काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुखर्जींच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनीही पित्याची कानउघाडणी केली आहे. त्यानंतरही प्रणवदा रेशीमबागेत पोहोचले आणि त्यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. 

 

प्रणव मुखर्जी यांच्या संघस्थानी जाण्याच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)  काय आहे, या संघटनेचे काम कसे चालते, संघटन वाढवण्‍यासाठी काय केले जाते याची खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...

 

सर्वांत मोठी स्वयंसेवी संस्था
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशातील सर्वात मोठी स्‍वयंसेवी संस्‍था मानली जाते. तिला संघ किंवा आरएसएस म्‍हणून ओळखले जाते. नागपूर येथे या संस्‍थेचे मुख्‍यालय आहे. संघाच्‍या पहिल्‍या शाखेत केवळ 5 व्‍यक्‍ती सहभागी होत्‍या. आज देशभरात 50 हजारांपेक्षा अधिक शाखा आहेत आणि त्‍यात लाखो व्‍यक्‍ती स्वयंसेवक म्‍हणून काम करतात.

 

सरसंघचालक मोहन भागवत
व्‍यवसायाने पशू चिकित्सक असलेल्‍या मोहन भागवत यांची सरसंघचालक म्‍हणून 2009 मध्‍ये निवड झाली. 11 सप्‍टेंबर 1950 ला चंद्रपूर येथे त्‍यांचा जन्‍म झाला. त्‍यांचे वडील मधुकरराव भागवत हे चंद्रपूर शाखेचे प्रमुख होते. त्‍यांनी गुजरातचे प्रांत प्रमुख, प्रचारक म्‍हणून सुद्धा काम केलेले होते. चार भाऊ-बहिणीत मोहन भागवत हे सर्वांत मोठे आहे. त्‍यांनी अकोला येथून पशू चिकित्सेचे शिक्षण घेतले. 1975 पासून संघाचे पूर्ण वेळ स्‍वयंसेवक म्‍हणून त्‍यांनी कामाला सुरुवात केली. पुढे नागपूर आणि विदर्भाचे प्रचारकसुद्धा राहिले. 1991 मध्‍ये आरएसएसच्‍या शारीरिक प्रशिक्षण कार्यक्रमात ते अखिल भारतीय प्रमुख झाले. 21 मार्च 2009 ला त्‍यांना के. एस. सुदर्शन यांच्‍या जागेवर सरसंघचालक करण्‍यात आले. 

बातम्या आणखी आहेत...