आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Fire तेलंगणाच्या वारंगलमध्ये फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये लागली भीषण आग, 11 जण ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तेलंगणाच्या वारंगलमधील फटाक्यांच्या गोडाऊनला भीषण आग लागली. त्यात 11 जणांचा मृत्यू झाला. फायर फायटर्स आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत असून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. वारंगलमधील कोटालिंगाला गावात ही घटना घडली. हे गाव वारंगल शहरापासून 135 किलोमीटर अंतरावर आहे. 


दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळाली आहे. आग लागली तेव्हा या गोडाऊनमध्ये 15 जण असल्याचे सुत्रांकडून समजतेय. आगीचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. मात्र या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. गोदामात मोठा स्फोट झाल्याचा आवाज प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...