आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणाची हानी करण्याच्या गुन्ह्यांत 2 वर्षांत 19% घट, 80% प्रकरणांत झाली शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्‍ली- देशात पर्यावरणाशी संबंधित किंवा पर्यावरणाला धोका पोहोचवणाऱ्या गुन्ह्यांत दोन वर्षांत १९% पर्यंत घट झाली आहे. त्याशिवाय या गुन्ह्यांत अटक केलेल्या आरोपींची संख्याही एक वर्षात ४% पेझा जास्त वाढली आहे. ही माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंद शाखेच्या (एनसीआरबी) अलीकडेच जारी अहवालात समोर आली आहे. अहवालानुसार २०१६ मध्ये देशभरात पर्यावरणाशी संबंधित ४,७३२ गुन्हे नोंदले गेले. २०१६ मध्ये ३,४५७ प्रकरणांची सुनावणी पूर्ण झाली. त्यापैकी सुमारे ८०% प्रकरणांत दोषींना शिक्षा सुनावण्यात आली. 

 

दिल्लीने चकवले, तेथे वायू, जल प्रदूषणाचा एकही गुन्हा नाही 

अहवालात आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे वायू प्रदूषणात अव्वल असणाऱ्या दिल्लीत त्यासंबंधी एकही गुन्हा नोंद नाही.दर हिवाळ्यात येथे प्रदूषण धोकादायक स्तरावर पोहोचते. अलीकडेच भारत आणि श्रीलंकेत दिल्लीत झालेल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या खेळाडूंना मास्क लावून मैदानात उतरावे लागले होते. त्याशिवाय येथे जल प्रदूषणाशी संबंधित एकही गुन्हा नोंद नाही. 

 

 

एक वर्षात ८ टक्क्यांची घट  

२०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये पर्यावरणाशी संबंधित गुन्ह्यांत ८% घट झाल्याची नोंद आहे. दोन वर्षांत प्रथमच पाच हजाराहून कमी नोंद झाली.  

 

वर्षात ४ % नी  वाढली अटकेची कारवाई  

२०१६ मध्ये पर्यावरणाशी संबंधित गुन्ह्यांत ८, ३८७ लोकांना अटक झाली. त्यात १५ महिला आहेत. सर्वाधिक ४ हजार ८०६ जणांना उत्तर प्रदेशात अटक झाली. एकूण कारवायांपैकी हे प्रमाण ५७ टक्के आहे.  

 

 

७५% गुन्हे उ.प्र., राजस्थानमधील  

पर्यावरणाशी संबंंधित गुन्ह्यांत उत्तर प्रदेश अव्वल, राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशा गुन्ह्यांतील सुमारे ७५ प्रकरणे याच दोन राज्यांतील दाखल झाली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत राजस्थानात मात्र त्यात ४० % घट. 

 

पुढील स्‍लाइडवा पाहा, १० राज्ये, २ केंद्रशासित प्रदेशांत पर्यावरणाशी संबंधित गुन्ह्यांत घट... 

बातम्या आणखी आहेत...