आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 नाैदल अधिकारी जामनगर ते काेलकाता दुचाकी यात्रेवर, 9 सागरकिनारी राज्यांतून प्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हे छायाचित्र दक्षिणेतील शेवटचा काेपरा असलेल्या रामेश्वरमच्या धनुष्काेडीचे अाहे. यात दिसणारे दुचाकीस्वार हे भारतीय नाैदलाचे अधिकारी अाहेत. या २५ अधिकाऱ्यांची टीम सागरी सुरक्षेचे महत्त्व सांगण्यासाठी जामनगर ते काेलकात्यादरम्यान यात्रेवर निघाली अाहे. यात काही महिला अधिकारीही अाहेत. २१ दिवसांच्या या प्रवासात नाैदल अधिकाऱ्यांची टीम नऊ सागरी राज्यांतून प्रवास करेल. सुमारे ६ हजार किमीचा हा प्रवास असेल.

 

या दरम्यान मार्गावरील सर्व एेतिहासिक दीपस्तंभांचीही ते पाहणी करतील. १० दुचाकीवर २० सदस्य स्वार अाहेत. इतर ५ अधिकारी कारमधून त्यांची साेबत करत अाहेत. ही टीम सध्या अाेडिशाहून काेलकात्याच्या दिशेने निघाली अाहे. एका दिवसात ते २५० ते ३२५ किमीचे अंतर कापतात तसेच रस्त्यात भेटणाऱ्या तरुणांना नाैदलात सहभागी हाेण्याचे अावाहन करतात. सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेबाबत जनजागृतीही करतात.

बातम्या आणखी आहेत...