आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगल्या उपचाराची मागणी करणाऱ्याला रुग्णालय स्टाफने मारुन मारुन केली हत्या, पत्नीचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी दिल्लीच्या आरटीआर हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली.-फाइल - Divya Marathi
सोमवारी दिल्लीच्या आरटीआर हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली.-फाइल
नवी दिल्ली - साऊथ वेस्ट दिल्लीच्या जाफरपूर कलां भागांत सरकारी हॉस्पिटल स्टाफवर पत्नीच्या उपचारासाठी आलेल्या व्यक्तीची मारहाण करून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या पत्नीचे म्हणणे आहे की, तिचा चांगल्या प्रकारे उपचार होत नसल्याची तक्रार केल्यानंतर हॉस्पिटलच्या स्टाफने तिच्या पतीला खोलीत कोंडून मारहाण केली. त्यानंतरल गंभीर जखमी झालेल्या या महिलेच्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसरीकडे हॉस्पिटलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. 
 
पत्नीच्या उपचारावर समाधानी नव्हता पती 
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार जफरपुर परिसरात राहणारे इलाके में रहने वाला (32 वर्षे) रविवारी पत्नीला उपचारासाठी राव तुला राम (RTR) हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. डॉक्टर त्याठिकाणी महिलेवर उपचार करत होते. पण सोनू या उपचारांनी समाधानी नव्हते. त्यामुळे सोनू यांनी डॉक्टरांकडे योग्य सुविधा मिळत नसल्याची तक्रार केली. 
- सोनूच्या पत्नीने आरोप केला की, माझ्यावर योग्य उपचार न झाल्याने सोमवारी माझ्या पतीचे कर्मचाऱ्यांशी वाद झाले होते. त्यानंतर काही लोक त्यांना इतर काही जणांनी खोलीत ओढत नेले आणि मारहाण केली. त्यात जखमी झालेल्या पतीचास मृत्यू झाला आहे. 
 
हॉस्पिटलने स्पष्टीकरण देताना काय म्हटले?
- हॉस्पिटलच्या अधीक्षक संगीता बसू यांनी आरोप फेटाळले आहेत. त्या म्हणाल्या आम्ही आमच्या पातळीवर सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. कुटुंबाच्या आरोपाप्रमाणे अद्याप आम्हाला मारहाणीचे पुरावे मिळालेले नाहीत. 
- सोनू सर्वात आधी रविवारी हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यावेळी काही पोलिस त्यांच्या पत्नीला उपचारासाठी घेऊन आले होते. एका महिलेने काहीतरी विषारी खाल्ल्याचे प्रकरण होते. सायंकाळी सोनू पुन्हा मद्यधुंद अवस्थेत आला आणि गोंधळ घालू लागला. 
- उपचारानंतर महिलेला सोडण्यात आले. त्यानंतर रात्री 2 वाजता महिला सोनूला घेऊन हॉस्पिटलमध्ये आली. तिने सांगितले की, तिच्या पतीच्या पोटात दुखत आहे. आम्ही तपासानंतर सोमवारी दुपारी सोनूला डीडीयू हॉस्पिटलला रेफर केले. अॅम्ब्युलन्समध्ये त्याला पाठवले तेव्हा आम्हाला माध्यमातून सोनूच्या मृत्यूबाबत समजले. 
 
पोलिस म्हणाले तपास सुरू 
दिल्ली पोलिसांच्या एखा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले की, कुटुंबाकडून सरकारी रुग्णालयात मृत्यू झाल्याची तक्रार मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. 
 
 
बातम्या आणखी आहेत...