आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल यांच्या कार्यालयात औरंगझेबचा फोटो? लग्न करताहेत? जाणून घ्या 5 Viral चर्चांचे सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी लोकसभेत अविश्वास ठरावावर दिलेल्या भाषणाची सर्वत्र चर्चा होत आहे. भाषणानंतर त्यांनी पीएम मोदींच्या जागेवर जाऊन त्यांची गळाभेट घेतली. त्यांची ही गळाभेट असो वा गळाभेटीनंतर जागेवर बसून डोळा मारण्याची पद्धत या सर्वच गोष्टी संसदेत पहिल्यांदाच दिसून आल्या. काँग्रेसने राहुल गांधींच्या भाषणाला आक्रमक म्हटले, तर भाजपने या भाषणाला राहुल यांची नौटंकी संबोधले आहे. यानंतर सोशल मीडियावर राहुल गांधींचे भाषण ट्रेंड करत होते. अनेकांनी त्यांना या भाषणावरून ट्रोल देखील केले आहे. 


नेहमीच होतात ट्रोल...
सोशल मीडियावर राहुल गांधी यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा अधिक ट्रोल केले जाते. या दोन्ही नेत्यांच्या भाषणाच्या क्लिप व्हॉट्सअॅप आणि फेसबूकवर एडिट करून कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला जातो. अशात राहुल गांधी यांच्याविषयी सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा देखील उठतात. त्यापैकीच एक म्हणजे, राहुल गांधी लवकरच लग्न करत आहेत. सोबतच, राहुल गांधी यांच्या कार्यालयात औरंगझेबचा फोटो आहे आणि राहुल गांधी कराटे ब्लॅक बेल्ट आहेत अशीही चर्चा होत राहते. अशाच 5 गोष्टींचे नेमके सत्य काय हे आम्ही आपल्याला सांगत आहोत. 


पुढील स्लाइड्सवर सविस्तर वाचा, राहुल यांच्या बाबतीत होणाऱ्या चर्चांचे सत्य...

बातम्या आणखी आहेत...