आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिन्हांना भेटणाऱ्यांच्या खात्यांची चौकशी होणार; कोळसा खाणपट्टा वाटप,काेर्टाला दिली माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कोळसा खाणपट्टा वाटप प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला सांगितले की, माजी सीबीआयप्रमुख रणजित सिन्हा यांच्या घरी भेट देणाऱ्यांच्या खात्यांची  चौकशी केली जाईल. सिन्हा यांनी  कोळसा खाण वाटप प्रकरणांची चौकशी प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आराेप आहे. सीबीआयचे विशेष तपास पथक याची चौकशी करत आहे.  


एसआयटीने न्या. मदन बी. लोकूर, के. जोसेफ व ए. के. सिकरी यांच्या पीठास तपासाच्या सद्य:स्थितीचा अहवाल सादर केला. या वेळी त्यांनी सांगितले की, व्हिजिटर्स बुकमध्ये नोंद केलीेल्या व्यक्तींची  संख्या डायरीत नोंद केलेल्या लोकांपेक्षा खूप अधिक होती. त्यामुळे घरी आलेल्या गाड्यांचे क्रमांक शोधून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे संबंधित लोकांपर्यंत पोहोचता येऊ शकेल. विशेष तपास पथकाची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील  आर. एस. चिमा म्हणाले, तपासाची कक्षा वाढवण्यात अाली आहे. 


चौकशीसाठी ६ महिन्यांचा अवधी मागितला. पीठाने कोळसा खाणपट्टा  वाटप प्रकरणांत ईडी व  सीबीआयच्या मंद तपासाबाबत नाराजी व्यक्त केली होती.  पीठाने म्हटले की, ईडीने ११ व  सीबीआयने १८ अहवाल दिले. सीबीआयने १ प्रकरण प्रलंबित असल्याचे सांगितले. पुढील  सुनावणी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात आहे. सिन्हांचे भेट प्रकरण समोर आल्यानंतर खळबळ उडाली हेाती.

बातम्या आणखी आहेत...