आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादेशिक पक्षांनी 2016-17 मध्ये जमा केला 321 कोटी पक्ष निधी, यातील 26% एकट्या समाजवादी पक्षाकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 2016-17 मध्ये देशातील 32 प्रादेशिक पक्षांकडे 321 कोटी रुपये  पक्ष निधी जमा झाला आहे. सर्वाधिक निधी हा समाजवादी पक्षाकडे जमा झाला आहे. त्यांनी जाहीर केल्यानुसार, 82.76 कोटी रुपये पक्षनिधी जमा झाला आहे. नॅशनल इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) यांनी प्रादेशिक पक्षांच्या निधीचा अहवाल तयार केला आहे. 32 प्रादेशिक पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या ऑडिट रिपोर्टवरुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे. याशिवाय 16 पक्षांचे ऑडिट रिपोर्ट निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. यामध्ये आम आदमी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स सारख्या पक्षांचा समावेश आहे. 

 

2016-17 मध्ये कोणत्या पक्षाला किती निधी मिळाला 

  प्रादेशिक पक्ष पक्ष निधी
1 समाजवादी पक्ष 82.76 कोटी 25.78%
2 तेलगु देसम पार्टी 72.92 कोटी 22.71%
3 एआयएडीएमके 48.88 कोटी 15.23%
4 शिवसेना 31.82 कोटी 9.91%
5 शिरोमणि अकाली दल 21.89 कोटी 6.82%
6 इतर 27 प्रादेशिक पक्ष 62.76 कोटी  19.55%

बातम्या आणखी आहेत...