आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल 46 दिवसांनंतर दरकपात, आधी 60 पैसे कपातीची घोषणा, 2 तासांनी केली दुरुस्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेल दर कपातीची आशा लागलेल्या भारतीयांची बुधवारी मोठी थट्टाच झाली. तेल कंपन्यांनी आधी पेट्रोल ६० पैसे स्वस्त करण्याची घोषणा केली. नंतर २ तासांनी चूक सुधारत ती दरकपात फक्त १ पैशावर आणली. याआधी १४ ते २९ मेपर्यंत सलग दरवाढ झाली. या १६ दिवसांत पेट्रोल ३.८० रु. म्हणजेच ३८० पैसे व डिझेल ३.३८ रु. महागले. दोन्हींचे दर ४७ दिवसांनी घटले. याआधी १२ एप्रिलला डिझेल व १२ एप्रिलला पेट्रोल ३-३ पैसे स्वस्त झाले होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले,  ‘पंतप्रधानजी, जर तुम्ही १ पैसे दरकपात करून चेष्टेचा प्रयत्न केला असेल तर हा बालिशपणा आहे.’ 

 

केरळात १ रुपया स्वस्त; पेट्रो.मंत्री म्हणाले, इतरांनीही कित्ता गिरवावा

केरळ सरकारने बुधवारी पेट्रोल-डिझेलवर व्हॅट १.६९% घटवला. यामुळे राज्यात इंधन १ रुपयापर्यंत स्वस्त होईल. दर नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणरे केरळे हे पहिलेच राज्य आहे. पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इतर राज्यांनीही याचे अनुकरण करावे, असे अावाहन केले. सकाळच्या दरकपातीच्या घोळावर ते म्हणाले, एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे ही गफलत घडली.

 

मनसेकडून ४ रुपये सूट

१४ जूनला राज ठाकरेंच्या वाढदिवशी मनसे मुंबईतील ३६ पेट्रोल पंपांवर दुचाकीस्वारांना प्रतिलिटर ४ रुपये स्वस्त दराने पेट्रोल विकून दरवाढीचा अनोखा निषेध नोंदवणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...